प्रवीण पडवेकरांच्या प्रचारार्थ आलेल्या मुकुल वासनिकांच्या भाषणादरम्यान नागरिकांचा काढता पाय !



प्रवीण पडवेकरांच्या प्रचारार्थ आलेल्या मुकुल वासनिकांच्या भाषणादरम्यान नागरिकांचा काढता पाय !

नंदू नागरकर यांचे दमदार भाषण समजले काय?

महायुतीला सत्तेतून बाहेर करा - विजय वडेट्टीवार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
विधानसभे करिता चंद्रपूर विधानसभे करिता राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उभे असलेले उमेदवार प्रवीण पडवेकर यांची जाहीर सभा काल रात्री गांधी चौक येथे संपन्न झाली. त्या कार्यक्रमात मतदातांना लोभवण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी गीतकार अनिरुद्ध वनकर यांनी राजकीय गीत गायन करून जनजागृती केली. चंद्रपूर विधानसभेतील प्रत्येक वार्डावरणातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने रोजंदारीतून महिलांना सभेत आणले . तेच चेहरे प्रत्येक उमेदवाराच्या रॅलीत अक्षरशः दिसणारे होते. हाताला काम नाही या माध्यमातून तरी आम्हाला सध्या रोजी रोटी मिळत असल्याची नाव न सांगता एका महिलेने आपले भाष्य कथन केले.
एकीकडे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीतला माल काढण्यासाठी मजूरदार मिळत नाहीत. इकडे उमेदवाराच्या प्रचारासाठी रोजंदारीवर व सध्या महिलांचे ज-ते पाहायला मिळतात.
 या सभेत अनेकांची भाषणे झाली, महायुती सरकारवर सर्वच नेत्यांनी सरसाधन साधले.
 याच सभेत काँग्रेसचे नेते तथा माजी नगरसेवक नंदू नागरकर यांची दमदार भाषणे झाली. परंतु त्याच्या भाषणात काय बोलले हे कोणालाच कळेनासे  झाले. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना एकमेकांना विचारले नंदू नागरकर काय बोलले? 
 तेथेच प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या भाषणाला सुरुवात होताच  खुर्च्यावर बसलेल्या महिलांनी , नागरिकांनी आपला काढता पाय घेतला. आणि हळूहळू  मैदान खाली होतात होत होते.
 याच कार्यक्रमासाठी आलेले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले महाराष्ट्रातील गद्दार महायुती सरकारला सत्तेतून बाहेर करा. महाराष्ट्रातील लुटारू,  असंवैधानिक, धोकेबाज सरकारने जनतेला वेटी धरण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कट्टीबद्ध आहे आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी,  महिला भगिनींना प्रतिमा 3000 रुपये, सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार रुपये प्रतिमा रोजगार भत्ता, महिलांना मोफत एसटी प्रवास व विविध विकास योजना कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी या सभेतून सांगितले. चंद्रपूर विधानसभेकरिता उभे असलेले प्रवीण पडवेकर यांना निवडून देण्याचे आव्हाने केले.
 चंद्रपुरात सध्या दोन राजकीय  पक्ष आमने समोर आहेत एकीकडे  महायुतीचे भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार, आणि  महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर  यांच्या थेट लढत होत असून चंद्रपुरातही चुरस निर्माण होत असल्याची जानकारात चर्चा आहे. किशोर जोरगेवार यांना एवढे सोपे नसून, त्यांनाही बंडखोरीच्या उमेदवाराला  रोखण्यात कितपत यश मिळते याकडेही नागरिकाचे लक्ष लागले आहे. एकंदरीत पाहता चंद्रपूरची जनता वीस तारखेला कुणाच्या गळ्यात मार घालेल हे 23 तारखेला कळेल.