सामान्य रुग्णालयाच्या बाहेर अज्ञात व्यक्ती मृता अवस्थेत आढळला
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सदरचा मृतक हा आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या बाहेरील फुटपाथवर पार्किंगच्या ठिकाणी मृता अवस्थेत आढळून आलेला आहे. मृतकाचे वर्णन -रंग सावळा, उंची अंदाजे 170cm, बांधा सडपातळ, सदर मृतकाजवळ चालण्यासाठी वाकर व हाताला जुने सलाईन लागल्याचे निशाण असून त्याचे अंगात तीन रंगाची NIKE असे लिहिलेली पांढरा केशरी व करडा रंग असलेली टी-शर्ट पायात मळकट रंगाचा पॅन नाकावर मस, व जुन्या जखमेचे व्रण तसेच कपाळावर जुन्या जखमेचे व्रण अशा अवस्थेत मिळून आलेला आहे. तरी आपल्या हद्दीत कोठे अशी व्यक्ती मिसिंग असल्याचे नोंद असल्यास आम्हाला कळवावे... पोलीस उपनिरीक्षक तृप्तीखंडाईत पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, मोबाईल नंबर 95 79 13 53 20