अर्जुन पुरस्कार काकासाहेब पवार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजाभाऊ कोळी यांचे कडून सानू डवरे हिचे स्वागत



अर्जुन पुरस्कार काकासाहेब पवार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजाभाऊ कोळी यांचे कडून सानू डवरे हिचे स्वागत

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
आपल्या चंद्रपूर माता महाकालीच्या पावन नगरीत आलेले ऑलम्पिक वीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त माननीय काकासाहेब पवार
आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक माननीय राजाभाऊ कोळी यांनी
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत कुमारी अबिजाह उर्फ सानू तुकारामजी डवरे द्वितीय, पदक प्राप्त विजेती
हिचे भरभरून कौतुक करून स्वागत केले. पुढील भविष्यासाठी खूप सार्‍या आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या प्रमुखउपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम पार पडला. त्यांनी चंद्रपूर माता महाकाली नगरी आलेल्या पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. जिल्हा क्रीडा संकुलनात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलची त्यांनी स्तुती केली. क्रीडा संकुलनातील ट्रॅक, जलतरण तलाव
आणि विविध कामांची पाहणी केली. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्माण व्हावे अशा प्रकारचे जिल्हा क्रीडा संकुलन आपल्या तयार होण्याचे मानस ठेवले असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुविधा युक्त क्रीडा संकुलन तयार होतील काही तालुक्यात त्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यासाठी त्या आधुनिक क्रीडा संकुलन तयार होत असल्याची माहिती चंद्रपुरात आलेल्या ऑलम्पिक वीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त माननीय काकासाहेब पवार, आणि क्रीडा मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजाभाऊ कोळी जिल्हा क्रीडा संकुलात भेट दिली.
यावेळी जलतरण तलावाचे प्रशिक्षक चंद्रपूर जिल्हा जलतरण असोसिएशन चंद्रपूर सचिव कैलास किरडे, सहसचिव अश्विन मुसळे, कोषाध्यक्ष मोरेश्वर भरडकर , सदस्य नीलकंठ चौधरी ,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश कुंड चंद्रपूर ,क्रीडा अधिकारी व बल्लारशा प्रभारी तालुका अधिकारी मनोज पांद्रम यांची उपस्थिती होती.