राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सानू डवरे द्वितीय, सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सिंधुदुर्ग जलतरण संघटना द्वारा मालवण, नगरपरिषद आणि महाराष्ट्र होशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित चौदाव्या राज्यस्तरीय सागरी खुल्या जलतरण स्पर्धेत चंद्रपूरची सात वर्ष वयोगटातून कुमारी अबिजाह उर्फ सानू तुकारामजी डवरे हिने द्वितीय क्रमांक पटकावून पदक प्राप्त केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत कर्नाटक, तामिळनाडू, वेस्ट बंगाल, आणि महाराष्ट्रातून जलतरण स्पर्धेसाठी स्पर्धक आले होते. सात वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 14 वी स्टेट लेवल ओपन स्विमिंग कॉम्पिटिशन चिवला बीच मालवण येते .500 मीटर टायमिंग मध्ये चंद्रपूरची सानू अवघ्या 5.59 मिनिटात हे अंतर प्राप्त करून द्वितीय स्थान मिळवले. तर प्रथम येणाऱ्या मुलीने 5.52 अशा मिनिटात अंतर प्राप्त करून विजयश्री प्राप्त केला.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनात. जलतरण प्रशिक्षक कैलास किरडे त्यांनी मोलाचे प्रशिक्षण देऊन यासाठी उपकृत केले.
जिल्हा जलतरनचे फिल्टर ऑपरेटर व व्यवस्थापक नीलकंठ चौधरी त्यांनी या यशाबद्दल भरभरून कौतुक केले. या यशाचे श्रेय प्रशिक्षक कैलास किरडे, वडील तुकारामजी डवरे, यांना दिले. जिल्हा जलतरण तलावात सरावासाठी येणाऱ्या जलतरण मित्र परिवाराकडून सानूचे
शाल, श्रीफळ, गुलदस्ता देऊन तिच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप हार्दिक अभिनंदन करण्यात आले.