30 तारखेला राजीव गांधी अभियांत्रिक महाविद्यालयात सेवाव्रतिंच्या कार्याचे स्मरण प्रख्यात विचारवंत डॉ. श्रीपाद जोशी यांची उपस्थिती



30 तारखेला राजीव गांधी अभियांत्रिक महाविद्यालयात सेवाव्रतिंच्या कार्याचे स्मरण

प्रख्यात विचारवंत डॉ. श्रीपाद जोशी यांची उपस्थिती असणार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सेवाव्रतिंच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणुन महाविद्यालयाने सेवाव्रतिंचे स्मरण हा कार्यक्रम गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयातील स्व. छोटुभाई सभागृहात आयोजित केलेला आहे.
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) बंद्रपुर हि विदर्भातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असुन या संस्थेची स्थापना सन १९५९ ला करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेत सर्वश्री यव रामबंद पोटदुखे, अॅड. व्हि. एन. स्वामी, छोटुभाई पटेल, डॉ. के. व्हि. चारी, रेखचंद पारेख, सदाशिवराव पोटदुखे, मनोहरराव कोतपल्लीवार, महादेव सिंग ठाकुर, मनोहरराव वेलकीवार, व पोपटलाल काच्छेला यांचे बहुमोलाचे योगदान आहे.
सन १९८३ रोजी या संस्थेची धुरा माजी संसद सदस्य व माजी केंद्रिय अर्थराज्यमंत्री स्व श्री शांतारामजी पोटदुखे यांनी आपल्या खांदयावर घेतली. स्व शांतारामजी पोटदुखे यांनी चंद्रपुर व गडचिरोली सारख्या शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्यात उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणुन अनेक शैक्षणिक संस्थाची मुहुतमेढ या विभागात रोवली याच अनुषंगाने चंद्रपुर जिल्यातील पहिले अभियांत्रिकी शिक्षण देणा-या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली सन् १९८३ साली राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलाजी हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात आले.
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलाजी चंद्रपुर हे महाविद्यालय गेल्या ४२ वर्षापासुन अविरतपणे या विभागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देत असुन या महाविद्यालयात जवळपास २५०० विद्यार्थी विविध विद्याशाखेत शिक्षण घेत आहे. सुसज्जीत प्रयोगशाळा ग्रंथालय हे या महाविद्यालयाचे वैशिष्टय आहे. या महाविद्यालयातर्फे यावर्षी जवळपास ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. त्यात प्रति वर्षी रुपये १६ लक्ष हे उच्च पॅकेज आहे.

महात्मा गांधीची पुण्यतिथी ३० जानेवारी रोजी आपण हुतात्मा दिन म्हणुन पाळतो. ३० जानेवारी हया हुतात्मा दिनाचे औचित्य साधुन स्व. शांतारामजी पोटदुखे तसेच जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहीनीचे सदस्य, वृक्षमित्रचे संस्थापक, ग्रामस्वराज्य संस्थेचे प्रचारक, मेंढा (लेखा) व मर्दा येथिल ग्रामस्थाना सामुदायीक वनहक्क देशात आमच्या गावात आम्हीच सरकार है घोषवाक्य देऊन ग्रामदानाच्या सर्व कायदेशिर औपचारिकता पूर्ण करुन त्यांच्या कल्पनेतले ग्रामस्वराज्य स्थापित करुन संपुर्ण देशात या गावाचा लौकिक वाढविला व सर्वायतन अशी संकल्पना मांडणारे स्व. मोहन हिराबाई हिरालाल. त्यांचे महिलांचा सहभाग दारुबंदी वनसंवर्धन व वनसंरक्षण आणी हक्क इत्यादी बाबतीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन ज्येष्ठ कवि, लेखक, समिक्षक, विचारवंत, वक्ते तसेच अनेक साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष अनेक वृत्तपत्राचे संपादक असे अष्टपैलु व्यक्तीमत्व असणारे डॉ. श्रीपाद जोशी आम्हास लाभलेले आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचेअध्यक्ष विनोद दत्तात्रय , प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे, संस्था सचिव जयंत वेलंकीवार यांनी दिली.