मे. अंबुजा सिमेंट प्रस्तावित प्रकल्पाची पर्यावरण जन सुनावणी रद्द करा:- राजेश वारलुजी बेले
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
में. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईनस्टोन माईन लखमापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर पर्यावरण विषयक जाहिर जनसुनवाई दि. ०३/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. होत असल्यामुळे या माईन प्रकल्पाला परवानगी न मिळण्याबाबत. अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केली आहे.
मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईन स्टोन माईन यांनी बार्खडी, उपरवाही, चांदूर, पिंपळगाव, लखमापूर आणि धुत्रा (ता. कोरपना) आणि सोनपूर (ता. राजूरा), जि. चंद्रपूर या गावामध्ये मराठा लाईनस्टोन माईन-II, (ML क्षेत्र-८८०.३१ हेक्टर) मधील विद्यमान १२०० ची यांच्यासह लाइमस्टोन प्रॉडक्शन कपॅसिटी (चुनखडी उत्पादन क्षमता) २.० दशलक्ष TPA विस्तार, पृष्टभागावरची माती ०.२५ दशलक्ष, कचरा / अपव्यय (ओबी/आयबी) २.४० दशलक्ष TPA, सवग्रेड ०.५० दशलक्ष TPA (एकूण खोदकाम ६.६५ लशलक्ष TPA), एकूण खोदकाम ६.६५ दशलक्ष TPA ) विस्तारी प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावनविषयक जनसुनावणी घेण्यात येत आहे.
सदर प्रकल्पामुळे राजुरा तालुक्यातील भेंडवी, हरडोना, ईसापूर, मंगी, सोनापूर, जामणी, चंदनवाही व नोकारीखुर्द तसेच कोरपना तालुक्यातील उपरवाही थुटरा, लखमापूर, कुकडसाथ, बिबी, नांदा, चांदूर, बाखडी, निम्नी, तळोधी, पालगाव व पिंपळगाव ही गावे या प्रकल्पाच्या वाढत्या प्रदुषणामुळे प्रभावित होणार आहे.
मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा सिमेंट वर्क या प्रकल्पामुळे गडचांदूर व लागुन असलेल्या १० ते १५ गावामध्ये खुप मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदुषण होत असल्यामुळे या प्रकल्पाला प्रदुषण नियंत्रण महामंडळ, चंद्रपूर याच्या द्वारे वारंवार प्रदुषण होत असल्यामुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेले आहे व या प्रकल्पाची बँक गॅरटी सुध्दा जप्त करण्यात आलेली आहे. तसेच प्रकल्पाच्या खाणीद्वारे घातक वायू प्रदुषण व जलप्रदुषण खुप मोठया प्रमाणात होत असल्यामुळे संपूर्ण परिसरात अनेक आजाराची लागण होत असल्याचे निर्देशनात येत आहे.
मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा सिमेंट वर्क या प्रकल्पामुळे गडचांदूर व लागुन असलेल्या १० ते १५ गावामध्ये खुप मोठया प्रमाणात घातक वायु प्रदुषण व जलप्रदुषण मुन्सीपल कॉरपोरेशन द्वारा निघणारा घणकचरा संकलन केंद्रात प्रकल्पाच्या परिसरात ठेवण्यात आला असल्यामुळे हया प्रकल्पाच्या परिसरात खुप मोठया प्रमाणात दुर्गंधींचा वास पसरत असल्यामुळे या संपूर्ण परिसरात मानवी जीव, वन्यप्राणी, पाळीव प्राणी, जल प्राणी व पक्षांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच दमा, हदय विकार, त्वचा रोग, डोळयाचे आजार, क्षय रोग, कॅन्सर, नवजात शिशुचे मृत्यू दर व गर्भवती महिलेला अनेक आजाराची लागण होत असल्यामुळे या में. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईनस्टोन माईन लखमापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर पर्यावरण विषयक जाहिर जनसुनावणीदि. ०३/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. होत असल्यामुळे या माईन प्रकल्पाला जनसुनावणी रद्द करून प्रकल्पाला पर्यावरण पनवानगी देण्यात येऊ नये कारण की, या प्रकल्पामुळे खूप मोठया प्रमाणात प्रदुषण वाढले असल्यामुळे प्रकल्प व्यवस्थापकावरती योग्य ती कार्यवाही करून जनतेला न्याय देण्यात मागणी पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्र मोदी जी, प्रधान सचिव पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, चंद्रपूर जिल्हाधिकारी, सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे करण्यात आली आहे.