चंद्रपूर मनपातील अमृत योजनेच्या चुकीच्या धोरणाने नागरिकांना त्रास , जनतेला त्वरित दिलासा द्यावा- सुरेश पचारे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत चंद्रपूर शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळाले नाहीत. तर ते कंत्राटदाराच्या चुकीने व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे चंद्रपूरकरांना शुद्ध पाण्या ऐवजी अमृत योजना विष कालवणारी ठरली आहे.
चंद्रपूर शहरातील शास्त्री नगर प्रभाग क्रमांक दोन येतील तीर्थरूप नगर येथे अमृत योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाईन चुकीच्या पद्धतीने टाकली जात असून, रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून अंदाजे दहा फूट खोल खोदण्यात आले आहे. या ठिकाणी चार ते पाच फुटाचे अवाढव्य पाईप टाकले जात आहे. या खोदकामात नागरिकांच्या नळाचे पाईपलाईन तोडले गेले आहेत. अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
मुख्य रस्त्यावर खोदकाम करून ठेवल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा लहान मुलांना घेऊन जाताना महिला पडल्या आहेत.
चांगल्या स्थितीत असलेले डांबर रस्ते फोडून कंत्राटदाराच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन अडीच वर्षापासून मनपात प्रशासन असल्यामुळे कंत्राटदार मन मर्जीने कामे करीत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्ते पूर्ववत व नळ जोडणी करून त्वरित देण्यात यावी. अन्यथा आठ दिवसानंतर जन आंदोलन करण्यात येण्याचा इशारा माजी नगरसेवक तथा गटनेते सुरेश पचारे यांनी पत्रकार परिषदेतून दिले. यावेळी चंदू भाऊ, विजय वेलपल्लीवार, प्रकाश कासटलेवार, चंदू नागदेवते, शंकर पचारे, प्रमोद टेम्परवार, आणि वार्डातील नागरिक यावेळी उपस्थित होते.