मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश तरी मुख्यालयातील खुर्चीचा मोह सुटेना !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
शासनाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काही अधिकारी व कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून एकाच टेबलवर एकाच विभागात ठाण मानून बसले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या चा आदेश तालुकास्तरावरील पंचायत समितीत झाला असून सुद्धा वसीलेबाजीतून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काम करताना दिसत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याच मुख्य कार्यालयात एका कर्मचाऱ्याने त्या टेबलचा जणू काही कंत्राटच घेतल्यासारखा अनेक वर्षापासून इथेच काम करत आहे. येथे कर्मचाऱ्यांनी प्रतिनियुक्तीच्या नावावर एकाच विभागातील टेबलवर
ठाण मानून बसले आहेत.
साधे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटायचे असल्यास त्याचे दर्शन घेतल्याशिवाय अधिकाऱ्याची केबिनमध्ये जाता येत नसल्याचे विदारक चित्र तिथे पाहायला मिळते. कधी साहेब विसित आहेत. तर कधी मीटिंगमध्ये आहेत, अशा प्रकारचे अधिकाऱ्याच्या केबिन समोरील या कर्मचाऱ्यांकडून ऐकायलाच मिळते.
यामुळे या ठिकाणी एकाच टेबलवर अनेक वर्षापासून काम करीत असल्याने या कर्मचाऱ्यांची जणू काही मनमानी प्रमाणे कारभार सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकास या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वारंवार हेलपाटा मारावा लागतात.
जिल्हा परिषद मधून अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नावापुरतेच आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मिनी मंत्रालयात शासन निर्णयाची पायमल्ली करून अधिकारी व कर्मचारी मुख्यालयातच कर्तव्य बजावत असून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या माध्यमातून अन्याय करीत आहेत. बाहेरील तालुक्यातील एखाद्या कर्मचाऱ्याला मिनी मंत्रालयात यायचे असल्यास येथील बदली झालेला अधिकारी मुख्यालयात ठाण मानून बसले असून टेबल सोडण्यास अजूनही इच्छुक नाहीत. जिल्हा परिषद च्या अनेक विभागात अशा प्रकारचे अधिकारी ,कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून एकाच टेबलवर काम करीत आहे. त्याकडे विभाग प्रमुख किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक पूर्व दुर्लक्ष करीत असल्याची बाब समोर येत आहे.
यामुळे नक्षलग्रस्त व दुर्गम ग्रामीण भागातील पंचायत समित्या मधील शासकीय कामकाजावर विपीरीत परिणाम होत आहे. मुख्य म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या मुख्यालयातच अधिकारी काम करीत असताना दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.