चंद्रपुरात छत्रपती महोत्सव निमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन
दि. 18,19, व 20 फेब्रुवारीला... गांधी चौकात..
चंद्रपूर-
चंद्रपूर मध्ये सर्व जाती धर्मीय, समाज संघटना, सर्व पक्ष प्रतिनिधी व शहरातील शिवप्रेमींच्या वतीने तीन दिवसीय "छत्रपती महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव स्थानिक गांधी चौक येथे पार पडणार असून विविध सामाजिक संस्था यात सहभागी होणार आहेत. दिनांक 18 फेब्रुवारीला छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा सकाळी 6:30 वाजता होणार आहे यामध्ये गट पहिला पुरुष गट 8 ते 14 वर्ष, गट दुसरा पुरुष खुला गट, गट पहिला महिला गट 8 ते 14 वर्ष, गट दुसरा महिला खुला गट प्रत्येक गटासाठी रोख बक्षीसे 8 ते 14 वर्ष गटाकरिता रोख बक्षीस प्रथम 5000, द्वितीय, 3000, तृतीय 2000. खुला गटाकरिता प्रथम 11000, द्वितीय 7000, तृतीय 5000 असे ठेवण्यात आले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये फक्त सामूहिक नृत्य तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व समकालीन प्रसंगावर आधारित राहील. या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 11000, द्वितीय 7000, तृतीय 5000 ठेवण्यात आले आहे., 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव पालखी मिरवणूक, सायंकाळी 4 वाजता गांधी चौक ते जटपुरा गेट ते गांधी चौक या मार्गाने निघणार आहे. पालखी मिरवणूकमध्ये ढोल पथक, लेझीम पथक, घोडे, शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा केलेले युवक तसेच मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसंगावर आधारित 10 देखावे राहील, मिरवनूक मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शिवप्रेमी साठी ड्रेस भगवा कुर्ता व पांढरा पायजामा, महिलांसाठी भगवी साडी अथवा ड्रेस
यासह इच्छुकांना स्वखर्चाने फेटे घालून देण्याची व्यवस्था राहणार आहे. सायंकाळी 8 वाजता जाहीर व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची लोकशाही या विषयावर तर 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य पोवाडा व बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम चंद्रपूर महानगरपालिकेचे पार्किंग मैदान गांधी चौक येथे होणार आहे. यावर्षीचा चंद्रपूर गौरव पुरस्कार प्राध्यापक सूर्यकांत खणके यांना देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोम्मक्का सुदर्शन उपस्थित राहणार आहेत.
या तीन दिवसीय छत्रपती महोत्सव मध्ये चंद्रपूर शहरातील शिवप्रेमीनी मोठया उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य व निमंत्रक संतोष कुचनकर यांनी केले पत्रकार परिषदेला सार्वजनिक छत्रपती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रा दिलीप चौधरी, सचिव हरीश ससनकर, उपाध्यक्ष डॉ दिलीप कांबळे, प्रा. निलेश बेलखेडे सहकोषाध्यक्ष प्रा. प्रसिद्धी प्रमुख विजय मुसळे मार्गदर्शक प्राचार्य सूर्यकांत खणके, नंदुभाऊ नागरकर, विजयराव टोंगे कार्यकारी सदस्य दिलीप रिंगणे, निमेश मानकर, दीपकभाऊ जेऊरकर, हे उपस्थित होते.