चंद्रपुरात अंकलेश्वर गेटवर विधवा महिलेच्या घराला अचानक लागली आग, आगीत संपूर्ण घर जाळून खाक !



चंद्रपुरात अंकलेश्वर गेटवर विधवा महिलेच्या घराला अचानक लागली आग,


आगीत संपूर्ण घर जाळून खाक !!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर अंकलेश्वर गेट जवळ एपीएस गर्ल्स कॉलेजच्या समोर असलेल्या श्रीमती संगीता हांडे या महिलेच्या घराला अचानक आग लागून स्वयंपाकाचा गॅसचा स्फोट झाल्याने
संपूर्ण घर जळून राख झाले. या गरीब महिलेच्या घरातील संपूर्ण साहित्य जडले असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहेत. आग लागली तेव्हा ही महिला कामावर गेली होती. आणि मुलगी बारावीची परीक्षा असल्याने ती परीक्षा द्यायला परीक्षा केंद्रावर गेली होती. मात्र घराला अचानक लागल्याने आजूबाजूच्या लोकांना घरातून धूर निघत असल्याचे दिसून आले. आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिली असताना सुद्धा अर्ध्या तासानंतर अग्निशामक यंत्र घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून राख झाले होते. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अग्निशामक यंत्र तत्पर असला पाहिजे होते तू तशीच सेवा महानगरपालिकेची दिसून आली नाही. यामुळे नागरिकांनी मनपाच्या अग्निशामक विभागावर रोष व्यक्त केला.