अवैध रेती चोरी करणाऱ्या वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई , तर मग,महसूल विभागाचे काम काय ? प्रधानमंत्री आवास योजनेचे काम रखडले !




अवैध रेती चोरी करणाऱ्या वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई , तर मग,महसूल विभागाचे काम काय ?
प्रधानमंत्री आवास योजनेचे काम रखडले !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व रेती घाटांचे लिलाव न झाल्याने वर्षभरापासून अवैद्य रीत्या रेतीची वाहतूक चोरट्या मार्गाने होत आहे. राज्यात नवीन सरकार बसले. महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री पदाचा कार्यभार हातात घेतला आणि महसूल प्रशासनावर आपला वचक दबावविण्यासाठी अवैद्य रित्या तस्करी होत असलेल्या रेती तस्करांवर आळा घालण्याचे निर्देश दिले असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अवैध रेती चोरी करणाऱ्या ०४ ऑटो अॅपे वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई 

 पोलीस निरीक्षक  प्रभावती एकुरके शहर पोलीस स्टेशन चंद्रपुर यांचे, आदेशान्वये पोउपनी संदीप बच्छीरे, व डी बी पथक यांनी आज  दि.२१ फेब्रुवारी ला  सकाळी ६ वा. विषेश मोहीम राबवित पोस्टे परीसरात अवैध्द धंद्‌यावर कारवाई करीत, चोराळा पुला जवळुन ईराईनदी पात्रातुन ०४ तिन चाकी ऑटो अॅपे वाहन बिना रॉयल्टी गौन खनीज रेती चोरी करूण वाहतुक करतांना मिळूण आल्याने बी.एन.एस. कलम ३०३(२), ४९ सहकलम १८१.१९२ मोटर वाहन अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले. यावेळी  ०२ ब्रास रेती किंमत अंदाजे २८,०००/-रुपये  व ४ तीन चाकी वाहने असा एकुण ३,४८,०००/- रूचा माल जप्त करण्यात आले.
सदरची कार्यवाही  सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर, श्री. संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा/सचिन बोरकर, पोहवा/संतोषकुमार कणकन, मपोहवा/भावाना रामटेके, नापोका/कपुरचंद खरवार, पोशि/इम्रान खान, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/सकुल चितौडे, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली आहे.

परंतु एकीकडे  राजकीय वरदस्त असलेल्या रेती तस्करांचा मोठ्या प्रमाणात लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा सुरू आहे. सर्वीकडे शासकीय काम जोरात सुरू आहेत. या कामासाठी लागणारी रेती   तस्करा करून पुरवठा होत आहे.  मात्र गोरगरिबाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी छोट्या  घरकुलांचे काम करणाऱ्या गोरगरिबांना रेतीसाठी  मरमर करावी लागत आहे. तसे करूनही  छोट्या  टालीने कामासाठी रेती आणल्यास  आता पोलीस प्रशासनही कारवाही करीत असल्याने  सर्वसामान्याचे घर बांधण्याचे स्वप्न स्वप्नच  राहील की काय? असा प्रश्न आता पडू लागला आहे. ह्या कार्यवाहया पोलीस विभाग करीत असेल तर, संबंधित महसूल विभागाचे काम काय? असा प्रश्न आता शासनातील  महसूल विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे.
आज सकाळी चंद्रपूर शहर पोलिसांनी  इरई नदीवरून छोट्या टालीने रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना
पाच  टाली चालकावर  पोलीस स्टेशनवर आणून त्यांच्यावर कारवाई केली.
ग्रामविकास व पंचायत  महाराष्ट्र राज्य विभाग यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2चे 22 जानेवारी 2025 ला सर्व ग्रामपंचायत स्थळावर या योजनेचा मोठ्या   थाटात लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे.  मात्र याच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनकृत मंजूर झालेल्या घरकुलांना  रेती मिळत नसल्याने आता प्रशासने वाकुल्या दाखवण्याचे काम करीत आहे. जिल्ह्यातील अनेक आवास योजनेच पोलीस प्रशासन कारवाई करीत असल्याने कामे रखडली आहेत.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बाबरकुडे यांनी शासनकृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलासाठी  शासन दराने रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.