आदिवासी युवक - युवतींचा विदर्भस्तरीय वैवाहिक परिचय मेळावा, नागरिक सत्कार सोहळाchandrapur


आदिवासी युवक - युवतींचा विदर्भस्तरीय वैवाहिक परिचय मेळावा, नागरिक सत्कार सोहळा

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर येथे संयुक्त आदिवासी कृती समिती चंद्रपूर यांच्या विद्यमाने विदर्भस्तरीय आदिवासी युवक - युवतींचा वैवाहिक परिचय मेळावा, व नागरिक सत्कार सोहळा शनिवार दिनांक 1 मार्च 2025 ला शकुंतला लाँन नागपूर रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना. डॉ. अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. त्यासोबतच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार असणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बाबुरावजी मडावी, सामाजिक विचारवंत हे आहेत. आदिवासी समाजाचे जमातीत स्नेह मिलन व्हावे, समाज एक संघ व्हावे, हा उदात्त हेतू आदिवासी समाजातील विदर्भस्तरीय आदिवासी युवक - युवती वैवाहिक परिचय मेळाव्याचे आयोजन सामाजिक दृष्टिकोनातून होणे काळाची गरज असून, या माध्यमातून ग्रामीण परिसरातील गरीबीमुळे आदिवासी मुला - मुलींचे विवाह करणे फार जिकरीचे झाले आहे. समाजाची आर्थिक विवेचन, विवाह युक्त मुले -मुलीं शोधताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. हा विचार घेऊन सामाजिक एकोप्याने  आदिवासी समाजातील  एकाच मंचावर मुला -मुलींचे विवाह जुळणे या बाबीचा विचार करून आयोजन समितीने हा मेळावा आयोजित केला आहे.
जिल्ह्यातील सर्व आदिवासी सामाजिक संघटना एकत्र येऊन  नवयुक्त महाराष्ट्र  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. अशोकरावजी उईके यांचा समाजाच्या वतीने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तेव्हा जिल्ह्यातील  नव्हे तर सर्व विदर्भातील आदिवासी  योग युतीने या वैवाहिक  परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी  असे आव्हान आज पत्रकार परिषदेतून  जितेश  कुळमेथे, डॉ. देव कन्नाके, भैय्याजी  उईके,औंकार गेडाम,  डॉ. मधुकर कोटनाके, माया पेंदाम,  रंजना कन्नाके  यांनी केले आहे.
आदिवासी युवक- युवती वैवाहिक परिचय मेळाव्याची स्मरणिका तयार होणार असून त्यानिमित्ताने नवोदित विचारवंत, लेखक ,कवी यांनी आपले सामाजिक लेख कविता   संयुक्त  आदिवासी कृती समिती  कडे पाठवावे. असे आवाहनही आज झालेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले.