महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या तृतीय साहित्य संमेलनाचे जळगाव येथे आयोजन




महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या तृतीय साहित्य संमेलनाचे जळगाव येथे आयोजन

दादासो. भगवान चित्ते यांची संमेलनाध्यक्षपदी तर उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली यांची निवड*

समाजातील अग्रणी नेतृत्व व अनेक क्षेत्रातील मान्यवरांचे विचारमंथन होणार*

*दोन परिसंवाद, कवीसंमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराची मेजवानी*

दिनचर्या न्युज :-
धुळे : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवार, दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी साईलिला सभागृह , डीमार्ट पुढे, पाचोरा रोड येथे होत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत चालणाऱ्या या एकदिवसीय साहित्य संमेलनात सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयावर विचारमंथन होणार असून दोन परिसंवाद, एक कवी संमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराचा यात समावेश आहे.

नाभिक समाजात अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंत आहेत. परंतु त्यांना हक्काचे स्थान मिळत नसल्याने ते प्रकाशात येत नाहीत. परिणामतः त्यांची प्रतिभा दडून राहते. समाजातील अशा या सर्व प्रतिथयश आणि नवोदित साहित्य व कलाप्रेमी आणि लोककलावंतांना हक्काचे स्थान मिळावे या सार्थ हेतूने महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली.

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघातर्फे प्रथम साहित्य संमेलन अमरावती येथे 9 नोव्हेंबर 2019 तर द्वितीय साहित्य संमेलन शेगाव येथे 8 मार्च 2022 रोजी अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. त्यानंतर आता हे तिसरे साहित्य संमेलन जळगाव येथे होऊ घातले आहे.
आयोजित तृतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक तथा नाभिक मंच संपादक दादासो. भगवान चित्ते (धुळे) यांची तर, उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली, बंगळुरू (माजी उपकुलगुरू, कर्नाटक राज्य ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी, गदग) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव) हे असून प्रमुख अतिथी म्हणून मा. सयाजी झुंजार (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई), मा. रितेश सेन (आमदार, वैशाली नगर, छत्तीसगड), मा. मनोज महाले (उपसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मुंबई) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 *दोन परिसंवाद* 
 या साहित्य संमेलनात दोन परिसंवाद होतील. 'सकल नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी उद्याच्या सामाजिक व राजकीय दिशा' या परिसंवादात प्रमुख वक्ते सर्वश्री महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मा. कल्याणजी दळे, दत्ताजी अनारसे, भगवान बिडवे, रवि बेलपत्रे तसेच राष्ट्रीय नाभिक संघटना मुंबईचे अध्यक्ष अरुण जाधव, सकल नाभिक समाज माळशिरस (जिल्हा सोलापूर) येथील युवा नेतृत्व किरण भांगे हे सहभागी असतील. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर असतील.
दुसरा परिसंवाद महिलांसाठी असून 'नाभिक समाजातील महिलांचे सबलीकरण' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ सुवर्णाताई वाघमारे  असतील. यात सौ. माया नंदुरकर (निवृत्त शिक्षिका), डॉ. हर्षदा निंबा बोरसे (शिक्षिका धुळे), अलका सोनवणे (सामाजिक कार्यकर्त्या), सौ. पुनम मनोज महाले (मुंबई ) यांचा सहभाग असेल.

 *कविसंमेलन आणि कलाविष्कार* 
 दुसऱ्या सत्रात  महाराष्ट्रातील कवींचे कवी संमेलन होईल. सूत्रसंचालन  सर्जनशील शब्दवेल साहित्य मंच पनवेल मुंबईचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर करतील.
 तत्पूर्वी, समाजातील लोककलावंतांच्या कलाविष्काराचा कार्यक्रम देखील याच मंचावरून सादर केला जाईल.

 *स्मरणिका, पुस्तक प्रकाशन आणि मान्यवरांचा सत्कार* 
 उद्घाटन सत्रादरम्यान साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. तसेच अनेक साहित्यिकांच्या काव्यसंग्रहाचे आणि साहित्यकृतीचे प्रकाशान मंचावरून केले जाणार आहे.

 समारोपीय सत्रात महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या कार्याचा आलेख आणि पुढील वाटचाल संघाचे अध्यक्ष श्री. शरद ढोबळे मांडतील. अध्यक्षांच्या उपस्थितीत ठराव घेऊन तिसऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप होईल.
या साहित्य संमेलनास समाजातील साहित्य व कलाप्रेमींसह नाभिक समाज बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ कार्यकारिणी अध्यक्ष: शरद ढोबळे, उपाध्यक्ष: मुकुंद धजेकर, गोपाळकृष्ण मांडवकर. कार्याध्यक्ष: प्रा.अविनाश बेलाडकर, चंद्रशेखर जगताप, अनिल मल्लेलवार, प्रकाश नागपूरकर, भगवान चित्ते,  सचिव: सुनीता वरणकर, कोषाध्यक्ष: सतिश कान्हेरकर, कार्यकारिणी सदस्य: संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, शिवलिंगजी काटेकर, उमेश अलोणे, डॉ.किशोर बिडवे,  प्रविण  बोपुलकर यांच्यासह मानद संचालक: संजय पवार, दत्तात्रय मोरे, अरुण सांगळे, मिलिंद नेरकर, राम पळसकर, गजानन मादेशवार, विशाल कान्हेरकर, आशिष घुमे, श्रीधर राजनकर, नीलेश  राऊत, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, अश्विनी अतकरे, अर्चना धानोरकर, प्रणिता राजूरकर, सुमनताई पवार, आशाताई दळवी,  किरण पेठे, प्रीतम पवार, विजय दळवी, गोपाल कडूकर, राजेंद्र इंगळे, डॉ.हेमंत बाभूळकर, अरविंद धजेकर, गजेंद्र धजेकर, आप्पासाहेब खोंडे, दिनेश एकवनकर, मनोज बोरगावकर, नवनाथ घोडके, जिवन निंबाळकर, अजिंक्य इंगळे, शशिकांत वखरे, विकास वानखडे, मंगेश माळी, उदय टक्के, दत्ताराम कदम, प्रा.निवृत्ती पिस्तूलकर, दादासाहेब काळे, सुरेश बोरसे, संजय साळुंके, भालचंद्र  गोरे, दिनेश महाले, दिनेश मोरे, सुदाम शिंदे, डॉ.महेश गायकवाड, राजेंद्र नगराळे, संजय वैद्य, शांताराम  चव्हाण, संजय पंडित, रविंद्र नेरपगारे, गणेश  वाळुंजकर, सयाजी झुंझार, प्रदीप पवार, राजेंद्र गणगे, मनोज कोरडे, पंकज भदाणे, माधुरी परपल्लीवार, प्रकाश पाटील, अशोक औटी, भारती सोनवणे, सुवर्णा वाघमारे, मंजुषा नांदूरकर आदींनी केले आहे.