जिल्ह्यात 'येलो अलर्ट' तरी कामगारांच्या भर उन्हात पेट्यांसाठी लंब्या रांगा !




जिल्ह्यात 'येलो अलर्ट' तरी कामगारांच्या भर उन्हात पेट्यांसाठी लंब्या रांगा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात कामगार कल्याण विभागाच्या वतीनेआज चिंचाळा न्यू एमआयडिसी जस्ट किचन या ठिकाणी  सकाळपासूनच कामगारांच्या पेट्या व साहित्य मिळतात म्हणून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकीकडे प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची दोन दिवस लाट, ' यलो अलर्ट' हवामान विभागाने जाहीर केला. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला. उष्णतेच्या लाटेपासून बचण्यासाठी नागरिकांनी उन्हात अधिक वेळ राहू नये असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. तरी कामगार कल्याण विभागाच्या
नोंदणी कृती कामगारांना या पेट्या वाटप होत असलेल्या योजनेसाठी हजारो कामगारांना आपल्या लहान मुलाबाळासकट उन्हात तानात एमआयडीसी परिसरात वाटप होत असलेल्या पेट्यांसाठी एक किलोमीटर पर्यंत उन्हात उभे राहावे लागले.
कामगार आपल्याला पेट्या मिळतात म्हणून सकाळपासूनच एमआयडीसीच्या या परिसरात मिळेल त्या वाहनाने दाखल झाले. प्रशासनाच्या वेळ खाऊ धोरणाने अनेकांना एकाच वेळेस बोलवण्यात आल्याने कामगारांना भर उन्हात तात्काळात राहावे लागले. अनेक कामगार एक दिवसाच्या कामाला बगल देऊन उष्णतेच्या लाटेत दिवसभर राहिले.
शासनाने 'हॅलो अलर्ट' जाहीर केला असताना सुद्धा कामगार कल्याण विभागाला प्रशासनाने दोन दिवस 'हॅलो अलर्ट' दिल्याचे भान राहिले नाहीत का? रखरखत्या उन्हात महिला पुरुष कामगारांना कुठलेही सुविधा नसताना लांबच लांब रांगांमध्ये तात्काळत राहण्याचे चित्र समोर आले आहेत. त्यामुळे कामगाराच्या पिळवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.