कामगार विभागाच्या डोळ्यावर पट्टी, जिल्ह्यात रोजगार कामगार आणि कंत्राटदार बोगस ! याद्यांची पडताळणी करावी !




कामगार विभागाच्या डोळ्यावर पट्टी, जिल्ह्यात रोजगार कामगार आणि कंत्राटदार बोगस ! याद्यांची पडताळणी करावी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना कामगार विभाग सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपूर द्वारा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ चंद्रपूर द्वारा जिल्ह्यात कामगारांच्या व संबंधित कंत्राटदारांच्या नोंदणी या कार्यालयात केल्या जातात. परंतु या कार्यालयात होत असलेल्या नोंदणी ह्या कामगार विभागाच्या डोळ्यावर पट्टी बांधून संबंधित कंत्राटदार व ज्या सेतू केंद्रातून ऑनलाइन पद्धतीने कामगारांचे कागदपत्रे सबमिट केले जातात. याची चौकशी केल्यास जिल्ह्यात कामगार विभागाकडून बांधकामाच्या नोंदणी ची संख्या किती आहे. तसेच रोजगाराच्या कामगारांची संख्या संख्या किती आहे. याची यादी जाहीर करावी. व संबंधित कामगारांना मनरेगाच्या अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावी. कारण कामगार कल्याण विभाग चंद्रपूर
येथे अनेक कंत्राटदार बोगस प्रमाणपत्र तयार करून कामगाराकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना प्रमाणपत्र देऊन आपला कामगार असल्याची नोंदणी करून घेतात. परंतु तो कामगार वर्षानुवर्षे त्यांच्याकडे कधीही काम करीत नाही असे कामगारांचेच म्हणणे आहे. यामुळे खऱ्या कामगाराची पिळवणूक होत असून ज्या कंत्राटदाराच्या आर्थिक व्यवहारामुळे प्रमाणपत्र घेऊन खोटे कामगार शासनाचा संपूर्ण फायदा घेत असल्याची बाब आता समोर येत आहे. यासाठी जिल्ह्यात खऱ्या कंत्राटदाराची व त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी प्रशासनाने करून ज्या कंत्राटदाराने बोगस प्रमाणपत्र कामगारांना दिले त्यांच्यावर कारवाई केल्यास जिल्ह्यातील फार मोठे खोट्या कामगाराचे मोठे राकेट उघडकीस येईल.
मागील पंधरा दिवसा अगोदर एमआयडीसी  येते  एका कार्यालयात सकाळी पहाटेला पाच वाजता पासून  कामगारांना साहित्य वाटपाच्यासाठी  भर उन्हात रांगा लागल्या होत्या. कामगारांना या चाळीसच्या  वर   तळपत्या तापमानात तळपळत राहावे लागले. 
बोगस कामगारांची यादी याची पडताळणी प्रशासनाने करू ज्या कंत्राटदाराकडून कामगार प्रमाणपत्र देण्यात येतात. अशा  कंत्राटदाराची व कंत्राटदाराकडे खरेच कामगार  काम करत आहेत का? याची तपासणी केल्यास कामगार कल्याण विभागाची पोर खोल झाल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षीच्या त्या कामगारांचे नूतनीकरण केल्या जाते. आणि कंत्राटदाराकडून खोट्या कामगारांचे प्रमाणपत्र गैर कामगारांना दिला जातात. मात्र यात जे  खरे कामगार आहेत  ते या योजनेपासून वंचित असतात.
 ज्या कामगारांचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून  दिले जाते त्यात कंत्राटदाराद्वारे त्या कामगारांचे इन्शुरन्स काढणे आवश्यक असते. परंतु  कंत्राटदार त्या कामगाराचे इन्शुरन्स काढत नाही. असा  प्रकार सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कामगार  विभाग कार्यालयात येणाऱ्या काही पिढीत कामगारांनी संबंधित माध्यमांना आपली आप भीती सांगितली. सकाळपासून सायंकाळ पर्यंत या कार्यालयात तात्कळत  राहावं लागतं. इथे दलाल ही सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून  कामगाराचे प्रमाणपत्र कार्यालयात गेले असतील तर बोगस कामगारांनाही या कार्यालयातून योजनेचा लाभ मिळत असल्याचे बोलले जात आहे. म्हणून संबंधित जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील  खऱ्या कामगारांची व कंत्राटदाराची पडताळणी करून यादी जाहीर  केल्यास  भविष्यात बोगस कामगार ,कंत्राटदार यांचे भिंग फुटणार?