महिन्यानंतरही अंजना कांमडी बेपत्ताच, मुलींचा पोलीस तपासावर आरोप
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिमूर येथील श्रीमती अंजना केशवराव कांमडी वय 64 नेहरू वार्ड चिमूर येथून दिनांक आठ मे 2025 पासून घरून बेपत्ता झाली आहे. या संदर्भाची माहिती संपूर्ण नातेवाईकाला, व 24 तासानंतर संबंधित चिमूर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. परंतु आज पर्यंत पोलिसांना साधा कुठलाही पुरावा शोधता आला नाही. पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेतून ज्योत्सना इटणकर, अर्चना तळस, वंदना गिरडकर, या बहिणी केला.आई हरवल्यापासून एक महिन्यानंतरही पोलिसांना कुठला साधा पुरावाही शोधता आला नाही. संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार या संदर्भाची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला फक्त तपास सुरू असल्याची माहिती देतात.
चिमूर शहरातील साधे सीसी कॅमेरे ही पोलिसांकडून तपासण्यात दिरंगाई केली असल्याचा आरोप केला.
या संदर्भाच्या तक्रारी केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना आमची आई लवकरात लवकर शोधावी यासाठी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती सांगितली.
बेपत्ता झाल्या एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला असून सुद्धा माझ्या आईचा कुठेतरी घातपात झाला की काय ?असे चिंतेचे भयभीत वातावरण कुटुंबात निर्माण झाले आहेत. चिमूर पोलीस माझ्या आईला शोधण्यात कमी पडत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून माझ्या आईचा बेदपत्ता झाल्याचा तपास हा गुप्तचर विभाग, गुन्हे अन्वेषण यांच्याकडे सोपवण्यात यावा अशी मागणी त्यांनी परिषदेच्या माध्यमातून केली.