मनपाच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे, प्रमोदभाऊचा अपघात होता होता वाचले !chandrapur mnp-chandrapur.html



मनपाच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे, प्रमोदभाऊचा अपघात होता होता वाचले !

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :- 
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पावसाळापूर्वी नाल्या उपसण्याचे काम जोमात सुरू असल्याचे भासवत असले तरी, शहरातील निम्म्या ठिकाणी नाल्या उपसण्याचे ढिसाळ काम मनपाकडून सुरू आहेत. असाच प्रकार गिरनार चौकातून सराफा लाईनच्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद भाऊ कडू एडवोकेट खेडकर यांच्या ऑफिस जवळून जात असताना खुल्या असलेल्या नालीत पडता पडता सुदैवाने वाचले.
महानगरपालिकेच्या कामगारांनी या नाली वरचे झाकण काढून त्याच्या आजूबाजूला मोठमोठे गोठे लावण्यात आले आहे. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तेच पडता पडता वाचल्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव या ठिकाणी उभे असलेल्या नागरिकांनी अनुभवला. महानगरपालिकेने त्वरित या नालीवरील झाकण लावून गल्लीतून जाणारा रस्ता पूर्ववत करावा.
पावसाचे पाणी या नाल्यात साचले तर या ठिकाणचा नालीतील गड्डा हा न दिसल्यास जीवितास हानी होऊ शकते. तत्पूर्वी महानगरपालिकेने यावर त्वरित उपायोजना करावी अशी मागणी होत आहे.