2 वर्षांची पगारवाढ द्या अन्यथा धान्याचे पोते उचलने बंद
पत्रपरीषदेत माथाडी कामगार प्रतिनिधि सपन मंडल चा इशारा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर.:-
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पडोली येथे ६१ नोंदणीकृत कामगार असून
सुमारे ५० कामगार धान्याचे पोते लोडींग अनलोडींग चे काम गेल्या काही वर्षापासुन करत आहे. गेल्या २ वर्षांपासून कंत्राटदाराने महामंडळाने ठरवलेली पगारवाढ माथाडी कामगारांना दिली नसल्याने कामगारांना आर्थिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही कोणताही तोडगा निघाला नाही आणि म्हणूनच कामगारांचे प्रतिनिधी सपन मंडल यांनी पत्रकार परिषदेद्वारे ८ ऑगस्टपासून पडोली वखार महामंडल येथील सरकारी गोडाऊन मधुन पोते उचलने बंद करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांनी सांगितले की, पडोली येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात महामंडळाने २०२२-२3 या वर्षासाठी ४.१७ रुपये आणि २०२3-२४ या वर्षासाठी ४.४७ रुपये पगारवाढ निश्चित केली आहे. ही निविदा जळगाव येथील एस के ट्रान्सलाइनला देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये दीक्षित नावाच्या व्यक्तिला किरकोळ कंत्राट देण्यात आला आहे. यापूर्वी या कामगारांना 3.१० रुपये वेतन देण्यात येत होते. महामंडळाने निश्चित केलेली वेतनवाढ स्वीकार नसल्याने कंत्राटदारांने उच्च न्यायालया नागपूर खंडपीठात माथाडी महामंडळाविरुद्ध खटला दाखल केला आणि कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचे म्हटले. या अन्यायाविरुद्ध माथाडी कामगारांनी वारंवार सरकारी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या संदर्भात अनेक बैठका झाल्या परंतु कधी अधिकारी आणि कधी कंत्राटदाराच्या अनुपस्थितीमुळे वेळ वाया जात आहे. माथाडी कामगारांनी कमी वेतनावर काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप तर कधी धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशी माहिती मंडल यांनी दिली.
शासन प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने माथाडी कामगार मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषणाला बळी पडत आहेत. येत्या काळात न्याय न मिळाल्यास ८ ऑगस्टपासून ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पडोळी येथे धान्याच्या पोत्या उचलणे बंद करतील असे कामगार प्रतिनिधी सपन मंडल यांनी पत्रकार परिषदेद्वारे माहीती दिली.
पत्रकार परिषदेत हेमुराज सिन्हा, कमलेश साहू, राकेश पटेल, पंचराम यादव, तेजराज साहू, ललित नितेवाल, शंकर कुमराम आदी उपस्थित होते.
दिनचर्या न्युज