चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे आदे हे जावई आहेत का? chandrapur cpv



चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे आदे हे जावई आहेत का ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ चंद्रपूर पाटबंधारे विभागात 2017 पासून भांडारपाल म्हणून कार्यरत असलेल्या अ.श्री. आदे हे मागील अंदाजे पंधरा 16 वर्षापासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत. आदे हे चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे जावई आहेत का? अनेक वर्षापासून यांच्या बदल्या होत असताना सुद्धा कुणाच्या वरदस्ताने हे या एकाच टेबलवर आपले बसस्थान मांडून बसले आहेत.
24 घंटे एकच प्याला घेत असलेला या आदेला शासन काम करण्याचे पैसे देतो, की टेबल सोडून वारंवार फिरण्याचे पगार  देतो. कुठल्या अधिकार्‍यांची यांच्यावर   जास्तच मेहरबानी आहे. की 24 घंटे एकच प्याला प्राशन केलेल्या या कर्मचाऱ्याला  कुठलेही काम न करता, बदली झाली असताना सुद्धा याच विभागात  एकाच टेबलवर वर्षानुवर्षापासून  खुर्ची न झिजवता कर्तव्यावर आहे. मात्र अशा कर्मचाऱ्याला प्रशासन कुठल्या  मोह -माया पाई  त्याची अजूनही बदली होत नाही.
 काही वर्षे अगोदरच याची यांत्रिकी मंडळ नागपूर विभाग नागपूर येथे बदली झाली होती. तिथेही हा महाशय न जाता चंद्रपुरातच पाटबंधे प्रकल्प विभागात आपली पुन्हा वर्णी लावून घेतली. एवढेच नाही तर 2020 मध्ये गडचिरोली पाटबंधारे विभाग इथे बदली झाली असताना  सुद्धा आधे चंद्रपूर पाटबंधारे विभागातच ठाम मांडून बसले. 2019 मध्ये आदे यांची बदली गोसीखुर्द प्रकल्प नागपूर आसोला मेंढा विभाग क्रमांक 2 सावली येथे झाली होती .परंतु ते चंद्रपुरातच पाटबंधारे विभागात  कर्तव्यावर राहिले. तीनदा बदल्या झाल्यानंतरही कुणाच्या वरदस्ताने  याला याच कार्यालयात  वारंवार पदभार मिळत असतो.
 आता अशी म्हणण्याची वेळ आली की यापूर्वीचे कार्यकारी अभियंता, आणि आताचे कार्यकारी अभियंता यांचे आशीर्वाद याच्या पाठीवर आहेत का? असा प्रश्न मात्र आता चंद्रपूरकरांनाही पडू लागला आहे. 24 घंटे एकच प्यालाच्या  तालात  असलेल्या कर्मचाऱ्यांवर  कुणाचे वरदस्त आहे. की हा  महाशय  वर कुठलेही काम न करता.  शासनाच्या पगारावर डल्ला मारत असतो. अशा कर्मचाऱ्यांची शासनाने योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत नागरिकाकडून आहे.