मोठा नर टस्कर हत्तीने घेतला इसमाचा बळी! सावली वनपरिक्षेत्रातील घटना




मोठा नर टस्कर हत्तीने घेतला इसमाचा बळी!
सावली वनपरिक्षेत्रातील घटना
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहाड उपक्षेत्रातील नियतक्षेत्र सामदा (ता. सावली) येथील श्री. अतुल फकीरा गोहणे रा. सोनापुर यांना दिनांक ०२.०७.२०२६ रोजी संध्याकाळी वेळ ७.३० वाजताचे दरम्यान रानटीहत्तीने हल्ला करुन श्री. नागोजी मळुजी मडावी रा. सोनापुर मालकीचे गट क्रमांक ५०३ शेतालगत सामदा सोनापुर रोडवर नागोबा देवस्थानाजवळ ठार केले.
घटनेचा तपशीलः
घटनास्थळः श्री. नागोजी मळुजी मडावी यांचे सर्व्हे नंबर ५०३, शेतालगत सामदा सोनापुर रोडवर नागोबा देवस्थानाजवळ (बिटः सामदा, राऊंडः व्याहाड, परिक्षेत्रः सावली, ता. सावली)
निदर्शनास आल्याची वेळः ०२ जून 2026, रात्रौ ८.०० वाजता झाल्याचे समोर आले.

सदर हत्तीच्या हल्यात श्री. अतुल फकीरा गोहणे रा. सोनापुर यांना हत्तीने रात्रौ ७.३० वाजताचे सुमारास ठार केले बाबत घटनास्थळावर उपस्थित अधिकारी कर्मचारी
. राजन तलमले, विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर, विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपुर
विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली, मारोती पुल्लेवाड, क्षेत्र सहाय्यक, व्याहाड,दिलीप शेडमाके, वनरक्षक, सामदा घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत.
वन विभागाकडून नागरिकांना सूचना देण्यात येते की,
सावली वनपरिक्षेत्रात दिनांक २९.०५.२०२६ पासुन ३० ते ३२ रानटीहत्तींचे कळपाचा वावर असुन वनविभागाद्वारे स्थानीक क्षेत्रीय वनाधिकारी/कर्मचारी बिट मदतनिस मजुर, व PRT चमुद्वारे रात्रौ पाळीत व दिवस पाळीत २४ तास गस्त व ड्रोनद्वारे हत्तींचे हालचालीवर बारकाईने लक्ष व संनियंत्रण ठेवण्यात येत असुन कोणत्याही प्रकारची मनुष्य हाणी व वित्त हाणी होवु नये म्हणुन काळजी घेण्यात येत आहे. व त्याबाबत लगतचे गावातील नागरिकांना सतर्कतेबाबत वेळोवेळी सुचना देण्यात येत आहे.
दिनांक ०१.०७.२०२६ रोजी रात्री हत्तीचा कळप शांततेत वैनगंगा नदी पार करुन गडचिरोली जिल्हयाच्या हद्दीत गेले. मात्र त्यातील मोठा नर टस्कर हत्ती मागे राहील्याने त्यांचे संनियंत्रण दिनांक ०२.०७.२०२६ रोजी सुरु असतांना सायंकाळी १ टष्कर हत्ती सामदा सोनापुर रस्ता ओलांडतांना सदरचा मृत इसम मोटार सायकलने जात असतांना हत्तीला बघुन रस्त्यावर थांबला व त्यांचे दोन साथीदार पळून गेले मात्र श्री. अतुल फकीरा गोहणे रा. सोनापुर हे मात्र तिथेच थांबल्याने सदरचे रानटीहत्तीने श्री. अतुल फकीरा गोहणे रा. सोनापुर यांना ठार केले.
अशा प्रकारचे घटना होवु नये म्हणुन वनविभागाद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करुन
सहकार्य करावे.
वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये लाऊडस्पीकर द्वारे तसेच जनजागृती फलक लावून पुढील सूचना देण्यात येत आहेत.
वनक्षेत्रात विनाकारण जाऊ नये.
रानटीहत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.