चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनीकडून पत्रकाराची कार्यशाळा, पण थोडीशी खंत ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्रातील संवर्धन परिसंस्था-चंद्रपूर जिल्हा विशेष या विषयावर चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे दि.३० जुलै २०२५ रोजी वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचेकरिता वन डे वर्कशॉप आयोजित करण्यात आले.या वर्कशॉपसाठी जिल्ह्यातील नामवंत पत्रकार तसेच ग्रामीण भागातून रिपोर्टींग करणारे अनुभवी पत्रकार उपस्थित होते.यासोबतच या वर्कशॉपला मार्गदर्शन करण्यासाठी वनविभागाचे सन्माननीय अधिकारी व तज्ञ मंडळी उपस्थित होते.नावनोंदणीचे सोपस्कार पार पाडून कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन सिसिएफ श्री.आर.एम.रामानुजन सर व अन्य वन अधिकारी यांच्या हस्ते झाले यासोबतच पत्रकारांचे दोन प्रतिनिधी दै.लोकमत टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी श्री.सुनिल बोकडे सर व दै.चंद्रधूनच्या प्रतिनिधी श्रीमती अल्का वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात सिसिएफ श्री.आर.एम.रामानुजन सर यांनी उत्कृष्टरित्या माध्यम प्रतिनिधींना विषयाला अनुसरून मुद्दे समजावून सांगितले,मार्गदर्शन केले एवढेच नव्हे तर विचारलेल्या प्रश्नांना शांत व संयमाने योग्य पध्दतीने उत्तर दिलेत.यासोबतच त्याच्या कार्यकाळात वाईल्ड लाईफच्या संदर्भाने जे अनुभव आले ते स्पष्टपणे व्यक्त झाले.हत्ती,वाघ किंवा आणखी वन्य प्राणी यांचे मानव वस्ती जवळ आल्यानंतरचे मानसांसोबतचे व्यवहार अगदी व्यवस्थित पटवून दिले.श्री.उमेश वर्मा यांनी अत्यंत प्रभावीपणे विषयाच्या अनुषंगाने माहिती दिली एवढेच नव्हे तर त्यांच्या समोर आलेले प्रत्येक प्रश्नाला साजेसा व अभ्यासू दृष्टीकोन ठेऊन उत्तरे दिली.प्रशिक्षण कालावधी सुरू झाल्यापासून तर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम पुर्ण होत पर्यंत ते माध्यम प्रतिनिधी सोबत होते.त्यांचा असलेला वनविभागातील अनुभव जे या प्रशिक्षणात प्रभावीपणे मांडले ते विषय तितक्याच प्रभावीपणे प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला योग्य पध्दतीने समजले.श्री.प्रभुनाथ शुक्ला सर यांनी इको टुरिझम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फाॅर वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट या विषयावरची सखोल माहिती दिली.जी माहिती ज्ञानात भर पाडणारी होती.वाघ,त्याची सिमा, उपाययोजना,मानवजीव व व्याघ्र संघर्ष रोकण्यासाठी वनविभागाची पहेल प्रभावी वाटली.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जी नवीन प्रणालीचा वापर केल्या जात आहे ते बेस्ट वाटले. Artificial intelligence technology for preventing man-animal conflict सक्षम पुर्वसुचना प्रणाली (सोलरबेस कॅमेरा) early worning system जे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १६ गावात चालू आहे.व ४ गावात ते लवकरच चालू होणार आहे.तर ७५ गावात ते लवकरच सुरू होणार आहे व तसा प्रस्ताव झाला आहे.हे चांगल्या प्रकारे समजून घेता आले.ताडोब्याला व त्यातील वाघांना पाहण्यासाठी २२ सफारी गेट आहेत.बघीरा ॲप,वन ई सेवा आदी सेवा हे राष्ट्रीय स्तरावर आपल्या नाविण्यपूर्णतेसाठी व उत्कृष्टतेची ओळख आहे हेच यातून सिद्ध होतांना दिसते.ब्रम्हपुरीचे जीवशास्त्रज्ञ श्री.राकेश अहुजा यांनी मानव व्याघ्र संघर्षाची कारणे व त्यावरील उपाय प्रभावीपणे सांगितले.ब्रम्हपुरी डिवीजनमध्ये जे बदलाव केल्या गेले ते जबरदस्त वाटले.वाघीण व त्यांचे बछडे (छावा) यांच्या स्वभावाची माहिती व त्याचे असलेले व्यवहार यांची माहिती चांगली होती.जर जंगलात जाणे गरजेचेच आहे तर जंगलात जातांना काय काळजी घ्यावी.ते सर्व सोप्या भाषेत सांगण्यात आले.प्राथमिक कृती दल,पीआरटी, पेट्रोलिंग ॲण्ड एवरनेस, सोलरबेस कॅमेरा, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर,वन नियंत्रण कक्ष,टोल फ्री नंबर यांचीही माहिती दिल्या गेली.श्री.आनंद रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या शिकारीच्या यासंबंधाने जे प्रकरण होते व त्या अनुषंगाने जे चौकशी झाल्या ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई झाली या संदर्भात विस्तृत चर्चा केल्या गेले.या प्रकरणातील आरोपी जे जेरबंद झाले आहेत व जे फरार आहेत त्यांच्या बद्दलही चर्चा करण्यात आली.वनविभागाची इंटेलिजन्स या टोळीला पकडण्यासाठी काय काय प्रयत्न करीत आहे याबद्दलची माहितीही माध्यम प्रतिनिधींना देण्यात आली.यावेळी श्री.एस.एस.दहिवले सर यांनी वनविभागाची स्थापना,वनांची व्याख्या,वनकायदा,वनअधिनियम,वनांची व्यापकता,त्याचे होणारे बदल यांची मुद्देसूद माहिती दिली.पुनर्वसीत गावांनाच राखीव जंगलालाच डी.रिजर्व फाॅरेस्ट करता येते हा सुद्धा मुद्दा अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटला.१२/१२/१९९६ चा लॅण्ड मार्क जजमेंट मुळे वनांच्या कायद्याची व्याप्ती समजली. reserved forest,protected forest, Village forest काय आहे व वनव्यवस्थापन समितीच्या संबंधाने केंद्राची व राज्याची मार्गदर्शक सूचना काय आहे हे समजले.वैयक्तीक हक्क, सामुहीक हक्क व पेसा गाव याबद्दलची सविस्तर माहिती मिळाली.वन डे वर्कशॉपमध्ये प्रेस माध्यम प्रतिनिधी पत्रकार म्हणून श्री.रवींद्र जुनारकर सर, श्री.प्रमोद उंदिरवाडे सर , श्री.अन्वर शेख,व श्री.राजेश नायडू सर यांनी प्रेस ॲण्ड मिडीया वर्किंग स्ट्रक्चरवर उत्तम मार्गदर्शन केले....
मिडिया रिप्रेझेंटीटीव्ह फ्राॅम चंद्रपूर डिस्ट्रिक्ट यांचे जे वन डे वर्कशॉप झाले.ते अत्यंत चांगले व समाधानकारक झाले.यातून अनेक गोष्टी शिकता आले.ज्ञात नव्हत्या त्या विषयांची माहिती मिळाली.काही गोष्टींवर चर्चा घडून आले.एकंदरीत वनविभागाने आयोजित केलेला वन डे वर्कशॉप अत्यंत प्रशंसनीय, प्रभावी व ज्ञानात भर घालणारा होता.
प्रशिक्षणार्थींना देण्यात आलेला नाश्ता,जेवण उत्तम होतं,जो स्टाॅफ होता त्यांच्याकडून मिळालेली वागणूक अत्यंत चांगल्या प्रकारे मिळाली,मार्गदर्शक म्हणून लाभलेले अधिकारी व तज्ञ मंडळी प्रभावशील होते.ज्ञानात भर घालणारे होते. काही प्रशिक्षणार्थींचे विचारलेले प्रश्नाचे समाधान झाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती.यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी समाधान न झालेल्या प्रश्नांबाबत कधीही प्रश्न विचारू शकता व माहिती घेऊ शकता अशी हमी माध्यम प्रतिनिधींना देण्यात आली.
वृत्तसेवा माध्यम प्रतिनिधी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची समन्वय समिती स्थापन करणे.व ती जिल्हा व तालुका स्तरावर समीती असे दोन स्तरावर असणे आवश्यक आहे.पत्रकार व वनविभागाचे एक वाट्स अप गृप महत्वाचे आहे. जेणेकरून एखादी घटना मानवजीव व व्याघ्र संघर्षाची तात्काळ माहिती मिळू शकेल.तालुका स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून वाघ व अन्य वन्यजीवांकडून झालेल्या घटनांची माहिती स्थानिक पत्रकारांना लवकर मिळेल यासाठी वरिष्ठ स्तरावरून आदेशित करण्यात यावे.याशिवाय इकोसिस्टीम स्ट्रक्चर या विषयावर तालूक्यातील माध्यम प्रतिनिधीचे वर्कशॉप घेतल्यास ते चांगले राहील.कारण वाघ व मानव संघर्ष हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील जंगलात जास्त पाहायला मिळतात.आणि मुख्यत्वे घनदाट जंगल हे ग्रामीण भागाकडे आहे.जिल्ह्यातील सर्व गुराख्याचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.याशिवाय संयुक्त वनव्यवस्थापन समिती अधिक प्रभावी बनतील यासाठीचे प्रयत्न महत्वाचे आहे.यासोबतच पोंभूर्णा येथील अडगडीत पडलेली नागरी वनव्यवस्थापन समिती तात्काळ गठीत करण्यासाठी ठोस पाऊले उचलली जावीत हे प्रामुख्याने होणे आवश्यक आहे.एकंदरीत वन डे वर्कशॉप उत्तम झाले आहे.
प्रशिक्षणातील विषय चांगल्या प्रकारे समजेल असे प्रामाणिक प्रयत्न वनविभागाकडून झाला आहे. इकोसिस्टीम व जंगल,मानव व्याघ्र संघर्ष -उपाय व खबरदारी -सांगण्याचा जो प्रयत्न झाला तो चांगला झाला आहे.आमच्यासाठी सदर प्रशिक्षण हे प्रेस मिडिया माध्यमांमध्ये वृत्तांकन करायला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. प्रेस व मिडिया प्रतिनिधींना देशात तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेलं ताडोब्याचं जंगल बघता यावं व तेथील जैवविविधता व वाघ व या सारखे अन्य वन्यप्राण्यांना पाहता यावा व त्याचा अभ्यास करता यावा यासाठी सफारीची सोय करण्यात यावी.यामाध्यमातून वनविभागाच्या कार्याचे स्ट्रक्चर जवळून पाहता येईल.
वन डे वर्कशॉपमध्ये उपस्थित प्रेस मिडिया प्रतिनिधी व वनाधिकारी,विषय तज्ञ यांचे आठवणीत राहावे यासाठी झालेला फोटोसेशन मस्त झाला आहे व वेळेत त्यांचे प्रिंट मिळाले तेही ग्रेटच.सर्वांचे आभार...!
काल चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी यांच्या तर्फे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अत्यंत कुशल कार्यशाळेचे नियोजन, आयोजन करण्यात आले होते. त्या प्रशिक्षणार्थ 40 45 पत्रकारांनी कार्यशाळेत अत्यंत वनविभागाचा महत्त्वाचा विषय समजून सहभागी दर्शवला. आपला आठ घंट्याचा अनमोल वेळ, या कार्य शाळेसाठी दिला. वन विभागाकडून एवढ्या कुशल कार्यक्रमात चहा नाश्ता आणि जेवणाच्या व्यवस्थेची फार मोठे चांगले आयोजन केले. परंतु शेकडो किलोमीटर आपल्या वाहनाने आलेल्या, जिल्ह्यातील पत्रकारांना या वन विभागाकडून साधे एखादे छोटेसे पारितोषिक (अनमोल असे गिफ्ट )द्यावे असे वाटले नाही. याची खंत मात्र पत्रकाराला वाटली. कारण त्या पारितोषिकाचे महत्व त्या झालेल्या कार्यशाळेच्या आठवणीचे धोतक स्मरणात राहिले असते.