चंद्रपूर - नागपूर भद्रावती आयुध निर्मित रेल्वे फाटकावर जीव घेणारे गतिरोधक



चंद्रपूर - नागपूर भद्रावती आयुध निर्मित रेल्वे फाटकावर जीव घेणारे गतिरोधक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भद्रावती येथील आयुर्धनिर्मित रेल्वे गेट जवळील फाटक्या जवळ दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गतिरोधक बनवण्यात आले. हा गतिरोधक या मार्गावर वाहन चालवणाऱ्यांना अपघाताला निमंत्रण देत आहे. राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहनांना हा गतिरोधक दिसून येत नाही. त्यावर संबंधित विभागाने रंगीत पांढरे पट्टे सुद्धा मारलेले नाही. गतिरोधकापूर्वी माहिती फलक देखील बसवण्यात आलेले नाहीत.
एवढेच नाही तर या मार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे सुद्धा पडले आहेत. त्यात पाणी भरले असता वाहनधारकांना गड्डा किती मोठा आहे हे दिसून येत नाही.
त्यामुळे या ठिकाणी चालकांना सुद्धा या गतिरोधकाचा, गड्ड्यांचा त्रास होत आहे.
नियमाला डावलून स्पष्ट न दिसणाऱ्या जीव घेण्या ब्रेकर वर गाडी उसळून पडून अपघात होत आहेत. आडनर्स फॅक्टरी येथून निघणाऱ्या बारूद च्या रेल्वे गाड्यांसाठी या ठिकाणी दोन्ही बाजूला ब्रेकर देण्यात आले आहेत. मात्र त्यावर संबंधित विभागाने वाहनधारकांना दिसेल असा प्रकारची कुठलीही व्यवस्था केली नाही. रात्री अक्षरशा या ठिकाणी वेगाने येणाऱ्या वाहनांना या गतिरोधकाचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागात भद्रावती कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता. कुठलाही अधिकारी उपस्थित मिळाले नाही. फोन द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. मोठा अपघात होण्याच्या अगोदरच या राष्ट्रीय महामार्गावर बनवलेल्या गतिरोधकावर तात्काळ रंगीत पट्टे मारण्याची मागणी होत आहे.