झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सुपर ओवर ! धडाकेबाज कारवाईने अधिकारी -कर्मचाऱ्यात धास्ती ! सर्व स्तरातून कामाची होतोय स्तुती !!



झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सुपर ओवर !

धडाकेबाज कारवाईने अधिकारी -कर्मचाऱ्यात धास्ती !

सर्व स्तरातून कामाची होतोय स्तुती !!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील मिनी मंत्रालय समजणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून जिल्हा परिषद मध्ये वेगळेच काही पाहायला मिळत आहे. सध्या सी ओ साहेबांनी स्पेशल ओवर घेऊन पहिल्याच ओवर मध्ये दोन विकेटा पाडल्या आहेत. त्यात दोन शिक्षकांना निलंबित करून घेतल्याने अनेकाचे विकेट जाईल अशा भीतीने सध्या पंचायत समितीसह जिल्हा परिषद मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
शाळेच्या वेळेचे उल्लंघन केल्यामुळे दोन शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये चांगलीच धास्ती भरलेली खळबळ उडाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून पंचायत समिती व शाळांना अचानक भेट देण्याचे सत्र सुरू केले. अचानक सी ओ साहेब कुठल्या पंचायत समितीमध्ये धडकतील याचा नेम नसल्याने पंचायत स्तरावरील अधिकाऱ्यासह कर्मचारी वर्गात चांगलीच खळबळ सुरू आहे. सिओ साहेबांच्या होत असलेल्या कामाची सर्व स्तरावरून स्तुती होत आहे. अशाच प्रकारची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील कर्तव्यावर कसूर, वेळ खाऊ धोरण, कामात अनियमयता आणि मिनी मंत्रालयाला भ्रष्टाचाराच्या आजाराची लागलेली कीड आहे.
सध्या जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी अनेक वर्षापासून तुमच्या कार्यालयात प्रतिनियुक्ती वर काम करीत आहे.
त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अनेक वर्षापासून जिल्हा परिषदच्या विभागा विभागात प्रतिनियुक्तीचा फायदा घेऊन वर्षानुवर्ष एकाच विभागात एकाच टेबलवर कार्य करीत असलेले कर्मचारी यांनाही सिओ साहेब आपल्या पेशल ओव्हर मध्ये बाद करतील का?
सध्या जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी अनेक वर्षापासून तुमच्या कार्यालयात प्रतिनियुक्ती वर काम करीत आहे. त्याचे काय?
असा सम्तप्त  प्रश्न  अनेकाकून केला जात आहे.
 शासनाने प्रत्येक कार्यालयात  फेस अॅप वर हजेरी लावण्याचे  निर्देश जाहीर केले आहेत.  वेळेत कार्यालयात यावे या दृष्टिकोनातून  फेस अँप ची सुविधा केली असली तरी अनेक कार्यालयात फेस अॅप शोभेच्या वस्तू बनवून आहेत. सिओ साहेबाची कार्यप्रणाली पाहता या यापचा फायदा करून घेतील का? या प्रणालीचा उपयोग करून कर्मचाऱ्यावर निर्बंध लावता येतील का?  आता सुरू असलेल्या कार्यप्रणालीवर  मुख्य कार्यकारी अधिकारी  यांचे तसेच वर्चस्व राहील  आणि धडाकेबाज कार्य राहिले तर  आतापर्यंत होत असलेल्या मिनी मंत्रालयातल्या  भ्रष्टाचाराच्या आजाराला औषध मिळाल्याशिवाय राहणार नाही.