भिवापूर प्रभागात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्याने रक्तदान शिबिर
शिबिरात १३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जनकल्याण सेवा सप्ताहा’च्या निमित्ताने चंद्रपूर शहरात भिवापूर प्रभाग, लालपेठ जुनिवस्ती येथे आमदार
किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल शेंडे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
शहरात ६३ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहर व परिसरातील विविध भागांमध्ये सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम पार पडले. या उपक्रमांमुळे शहरात उत्सवाचे आणि सेवा भावनेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
सेवा सप्ताहांतर्गत भिवापूर प्रभाग, लालपेठ जुनिवस्ती
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हाकेला हाक देत, प्रेम व जनकल्याण भावनेतून प्रेरित होऊन, आत्मीयतेने १३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि माणुसकीचा भावनेमुळे कुठल्यातरी एखाद्या गरजवंताचे जीवन वाचवावे या दृष्टिकोनातून आयोजित रक्तदान शिबिर अमोल शेंडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. नागरिकांनीही उत्कृष्ट सहभाग नोंदवला. त्या सर्व रक्तदात्यांचे आणि वार्डवासीयाचे या आयोजित कार्यक्रमात सहभाग दर्शवाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारही मानले.
पावसामुळे अनेकांना येऊन सुद्धा रक्तदान करता आले नाही तरीपण त्यांच्या भावना ,तयारी, इच्छाशक्ती हीच या उपक्रमाची खरी ताकद आणि समाजासाठी असलेली निस्वार्थ सेवा आहे. हा उत्साह तेवत ठेवायचा असून देवाभाऊच्या सेवाभावी सप्ताह आमदार किशोर जोरगेवारांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल शेंडे यांच्या नेतृत्वात असे सामाजिक ,जनहितार्थ उपक्रम सामान्य जनतेच्या मदतीसाठीच करीत राहू अशी भावना व्यक्त केली .