सौ. अमृता फडणवीस, यांनी भिवापूर येथील महाकाय शिवलिंगाचे केले महारुद्राभिषेक विधिवत पूजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून
श्रावण सोमवारच्या निमित्ताने भिवापूर येथे महारुद्राभिषेक व भक्तिभावाचा महासंगम" आज पहिल्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अर्धांगिनी सौ. अमृता फडणवीस त्यांच्याकडून हजारो शिवभक्तांच्या साक्षीने शिवलिंगाची विधिवत पूजा-अर्चना आणि भव्य महारुद्राभिषेक संपन्न झाला. श्री कावळ यात्रा 2025 अंतर्गत आयोजित या दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने महामृत्युंजय मंत्राच्या सामूहिक पठणात महारुद्राभिषेक पार पडला. या प्रसंगी "हर हर महादेव" च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते.
अशा भक्तिमय वातावरणात सहभागी होण्याचा योग लाभल्याने मन अत्यंत प्रसन्न आणि ऊर्जा-पूर्ण झालं.
त्यांनी 55 नद्यांच्या पाण्याने पवित्र जलाभिषेक आणि 1 हजार 55 बेलपत्राच्या पानांनी शिवलिंगावर अर्पण करून समाधान मिळालं.
शिवलिंगाचे अभिषेक पहिल्यांदा माझ्या हाती झाले म्हणजे काय, आता स्त्रीच्या हाताने आज पासून प्रत्येक स्त्री अभिषेक इथे करू शकेल.
प्रत्येक क्षेत्रात, स्त्रियांनी पुढे चालले आहेत. कारण आपल्या पाठीशी आमदार जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी अशा लोकांचा साथ असल्यामुळे स्त्रिया एरियात वार्डात सामाजिक उपक्रम घडून येत आहेत.
सामाजिक उपक्रमात आज माझ्याकडून सायकलीचे वाटप करण्यात आले. त्यांच्या जीवनाला एक वेग मिळेल, आईंना समाधान मिळेल. यापुढे माझ्याही संघटने कडून अशा सामाजिक उपक्रमात सायकल वाटप करण्याचा योग आल्यास मी ते हातभार लावीन अशाही फडणवीस म्हणाल्या. मुली आपल्या कुटुंबाला सांभाळून नंतर देशालाही उज्वल करण्याचे एक काम करणार आहेत.
मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो की चंद्रपूरकरांनी, हा योग आज माझ्यासाठी अभिषेक करण्याचा. देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त शेकडो उपक्रम या ठिकाणी राबवल्या गेल्याचे मला आनंदच होतो. देवेंद्रजीने लोकसभेसाठी सर्वांग अर्पण केले. कारण इथे जो वाढदिवसानिमित्त मी आज अभिषेक केला. वेगळा सुख समाधान आनंद मिळाल्याचे त्या म्हणाल्या. चंद्रपूर हे पर्यटनासाठी ताडोबा प्रसिद्ध आहे. इथे कॉलमाईच आहे. वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा आहेत. पण या ठिकाणी प्राचीन काळी हेमाडपंथी एवढी मोठी शिवलिंगाची पिंड , आणि अनेक साऱ्या मुर्त्याही या ठिकाणी असल्याने या ठिकाणी मंदिर पर सुंदर बनवायचे आहे. असे त्या म्हणाल्या. कारण इथे मला एका वेळची मनाला जागृती अनुभवास आली. मी दरवर्षी माझ्याच घरी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पूजा अर्चना करीत असते. कारण मी महादेवाची परमभक्त आहे. परंतु आज श्रावण पहिल्याच सोमवारी मला चंद्रपुरात महाकाय अशा शिवलिंगाचे महारुद्राभिषेक करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी चंद्रपुराकरांचे आभार मानते
आता वर्षातून दोनदा मी चंद्रपूरला येणार कारण इथे येऊन मला जे समाधान मिळाले ते अद्वितीय आनंद झाल्याच्या त्या म्हणाल्या .
चंद्रपूर जिल्ह्याची आमची नाळ जुळली आहे. शोभा काकू आहेतच . आता मी पण तुमच्या प्रेमामुळे इथल्या लोकां भेटण्यासाठी आवर्जून येईल.
यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.