चंद्रपूर शहरात राजकीय नेत्याच्या बॅनर वरून 'झाकून होत ते उघडं झालं!


चंद्रपूर शहरात राजकीय नेत्याच्या बॅनर वरून 'झाकून होत ते उघडं झालं!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या राजकीय नेत्याच्या बॅनर वरून शहरात राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे.
19 जुलैला भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले शुभेच्छा फलक. या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अशोक उईके, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार आणि भाजप नेते रविंद्र शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत.
मात्र, या सर्व फलकांवरून राज्याचे माजी, पालकमंत्री वने व सांस्कृतिक मंत्री ज्येष्ठ नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार
यांचा फोटो नसल्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत गटबाजी ' झाकून होती ती उघड झाली ' यात तीळ मात्र ही शंका राहिली नाही.
चिमूर क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विकास पुरुष माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यात कट्टर राजकीय वैर सामोर असल्याचे दिसून येत आहेत. यात चंद्रपुरात भाऊ चे कट्टर समर्थक व एकेकाळी खांद्याला खांदा लावून भाऊचे गोडवे गाणारे, फोटोसाठी भाऊच्या मागे मागे असणारे, दैवत मानणारे स्वार्थासाठी वाहत्या प्रवाहाच्या दिशेने गेले आहेत. यामुळे भाऊंना काही फरक जाणवेल असे वाटत असले तरी, भाऊच्या जनार्दनात काही फरक पडणार नाही. असे राजकीय जाणकाराचे मत आहे.
शहरात बॅनरबाजी रंगली ही नेमकी जाणीवपूर्वक घडलेली असली तरी, याचे राजकीय परिणाम काय होतील, हे वरिष्ठ नेत्याची काय भूमिका आहे. सर्व एका राजकीय नेत्याला खाली खेचण्याचा वरिष्ठ पातळीवरचा गनिमी कावा तर नसेल ना ! अशी चर्चा होत आहे.