जीवन संघर्ष आणि प्रेम उठाव या पुस्तकावर विश्वविक्रमाची ऐतिहासिक मोहर
दिनचर्या न्युज :-
प्रतिनिधी l कल्याण
साहित्यिक नवनाथ रणखांबे यांचे शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले "जीवन संघर्ष" आणि "प्रेम उठाव" या पुस्तकांचा सन्मान आशियाई वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने झाला आहे
या दोन्ही पुस्तकांची प्रसार माध्यमातून जोरदार चर्चा झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात 'प्रेम उठाव' या काव्यसंग्रह पुस्तकावर परिक्षणे, आभिप्राय, समीक्षा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त समीक्षक, साहित्यातील जाणकार, सुज्ञ वाचक वर्गांनी केली असून ती दर्जेदार दैनिके, साप्ताहिके, मासिके इ. मध्ये प्रकाशित झाली आहे. प्रेम उठाव या पुस्तकावरील 171 परिक्षणांची ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद आणि जीवन संघर्ष पुस्तकावरील 231 परिक्षणांची ऐतिहासिक नोंद आशियाई वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे. त्यामुळे नवनाथ रणखांबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
"जीवन संघर्ष या पुस्तकाची विविध बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यापूर्वी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ऐतिहासिक नोंद झाली होती. असा रेकॉर्ड यापूर्वी माझ्याशिवाय कोणाची झाला नाही . आता नवा रेकॉर्ड ऐतिहासिक विक्रम माझाच झाला असून जीवन संघर्ष आणि प्रेम उठाव या पुस्तकाने केला याचा मला फार आनंद होत आहे. ज्या ज्या कवी, साहित्यिकांनी, आणि वाचक वर्गानी पुस्तकावर अभिप्राय, समीक्षा, परिक्षणे लिहिली त्यांना व परिक्षणे प्रसिद्ध करणाऱ्या प्रसारमाध्यमांना, मला मार्गदर्शन करणाऱ्या, आणि माझ्या सदकार्यात मदत करणाऱ्यांना आशियाई वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान मी कृतज्ञता पूर्वक अर्पण करतो " असे मत यावेळी नवनाथ रणखांबे यांनी व्यक्त केले आहे.
दिनचर्या न्युज