पोस्ट ऑफिसच्या नवीन डिजिटल प्रणालीमुळे सर्वर डाऊन, नागरिकांची ससेहेलपट!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य प्रबंधक डाग विभाग चंद्रपूर येथील पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रोज शेकडोच्या संख्येने नागरिक लाईन मध्ये उभे राहतात. परंतु या कार्यालयात शासनाकडून लावण्यात आलेल्या नवीन डिजिटल प्रणालीमुळे पोस्ट ऑफिस मधील सर्वर डाऊन होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची ससेहेलपट होत आहे .यात वयोवृद्ध, नागरिकांना तासान तास रांगेत उभे परत पावलांनी जावे लागत आहे.
रक्षाबंधनाचा सना निमित्ताने पोस्ट ऑफिस मध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. तत्वतः काही दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे काही दिवस पोस्ट ऑफिसही बंद होते. याचाही फटका नागरिकांना बसला.
नवीन डिजिटल प्रणाली लागू केल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाले आहेत. त्याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. टपाल विभागाकडून विशेष तयारी केली जात असली तरी, रजिस्ट्री, स्पीड पोस्ट अशा बुकिंग सर्वर डाऊन असल्यामुळे थांबल्या आहेत. याचा परिणाम समोर असलेल्या राखी सणावर पळत आहे पडणार आहे. तत्वतः इमर्जन्सी पोस्ट बुकिंग करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. चंद्रपूर गडचिरोली विभागातील अनेक टपाल कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहेत.
भारतीय टपाल विभागाने जलद आणि ग्राहक-केंद्रित सेवेसाठी आयटी २.० उपक्रमांतर्गत एक नवीन प्रणाली लागू केली.या प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्यांमुळे ग्राहकांना खूप निराशा सहन करावी लागली, सोमवार, ४ ऑगस्टपासून ही सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली.
ग्राहकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त काउंटर केले तयार.
नवीन सर्वर असल्यामुळे ग्राहकांना थोडा त्रास होत आहे.
परंतु ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये. राखी सणाच्या निमित्ताने वाढत्या दबावामुळे, पोस्ट ऑफिसमध्ये राखी पाठवण्यासाठी जलद आणि सामान्य बुकिंगसाठी ४ काउंटर सुरू करण्यात आले आहेत. पाच वाजता सुद्धा अतिरिक्त काउंटर सुरू राहते. बहिणीच्या राख्या भावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व तो परी प्रयत्न करीत आहोत.
मुख्य प्रबंधक. - पी.डी. सरकार, , चंद्रपूर
