दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील सर्व धर्मसमभाव प्रभू सेवा संस्था ही मागील वर्षापासून दुनियेच्या काळोख्यात भटकलेल्यांना उजेडात आणण्याचे काम ही संस्था करत आहे. रस्त्यावरील निराधार , भिकारी, मनोरुग्ण, वाटसरू, मतिमंद, पोरक्या झालेल्या निरागस, निराश्रीत अशा प्रभूंना निस्वार्थ सेवा देण्याचे काम सातत्याने करीत आहे.
ज्या निराधारांचे छत हे फक्त आकाश आहे. अशा हरवलेल्या मनांना जो समाज वाऱ्यावर टाकतो. कुटुंबापासूनही अलिप्त असणाऱ्या, किंवा हरवलेल्या व्यक्तींना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या प्रभूंना त्याची वाढलेली कटिंग दाढी, आंघोळ, कपडे, चप्पल घालून त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार समाजात हे पुण्याचे काम ही संस्था करीत आहे.
त्या काळोखाच्या अंधारात असणाऱ्यांना उजेडात आणण्याचे काम या प्रभुला सेवा देण्याच्या माध्यमातून ही संस्था मनधर्याने पार पाडत आहे.
काटेरी झुडपातून रस्ता शोधत जाताना पायाला काटा टोचतोच ! त्याची पर्वाही न करता. अशीच सेवा हि सर्व धर्मसमभाव प्रभू सेवा संस्था करीत राव.
समाजातील दानशूर संस्थेने, व्यक्तीने निस्वार्थपणे आपल्या येता शक्तीने या संस्थेला साहित्यरुपी योगदानाची गरज आहे. जेणेकरून निराधारणा त्याचा अधिवास, आसरा ,आधार देण्यासाठी एका आश्रमाच्या जागेचा शोध सुरू आहे. सहकार्य केल्यास ह्या संस्थेला मोलाचे सहकार्य होईल.
'प्रभूला सेवा देणे हे ईश्वरी सेवा 'असून यातूनच खऱ्या देवरूपी , देव माणसाला शोधण्याचा आनंद होतो.!
अशा सेवाभावी संस्थेला मनःपूर्वक शुभेच्छा !