अमली पदार्थ विक्री करणारे दोघे ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक १४/०८/२०२५ रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर हद्दीत Mephedrone Drug हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने गुरुदेव चौक बाबुपेठ परिसरात सापळा रचुन दुचाकी वाहनावरील चुन्नु महेश गुप्ता वय १९ वर्ष, रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर आणि हर्षित अशीत टिकदार वय २० वर्ष रा. बाबुपेठ वार्ड चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन एकुण ०४.४५० ग्रॅम Mephedrone Drug हा अमली पदार्थ आणि दोन वाहने, धारदार चाकु सह इतर मुद्देमाल असा एकुण १,७४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये अपराध क्रमांक ५८३/२०२५ चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, सुरेद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, चापोअं मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.