चिंतामणी महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी



चिंतामणी महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोंड सर होते तर प्रमुख अतिथी प्राचार्य नक्षीने सर, प्रमुख अतिथी डॉ. शीला नरवाडे मॅडम सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ उपस्थित होत्या. हा कार्यक्रम सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, महिला अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मान्यवरांनी या दोन्ही नेत्यांविषयी त्यांच्या जीवन कार्याची माहिती करून दिली. एक ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचा पुणे येथे मृत्यू झाला. लाल बाल पाल या त्रिकुटा पैकी ते एक जहालवादी नेते होते .ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते .ब्रिटिशांनी त्यांना" भारतीय असंतोषाचे जनक" म्हणून मानले . तसेच लोकमान्य ही पदवी त्यांनी बहाल केली. लोकमान्य टिळकांनी घेतलेली शपथ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध का आहे आणि तो मिळणारच याशिवाय शिकत असताना मी शेंगा खाल्ल्या नाही त्यामुळे मी टरफल उचलणार नाही अशा प्रकारच्या बाणेदार उत्तरावरुन त्यांची ओळख आहे प्रसिध्द आहे. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांना अण्णाभाऊ साठे नावांनी ओळखले जाते. ते एक समाज सुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे यांना दलित साहित्याचे संस्थापक म्हणून श्रेय दिल्या जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर ,श्रीपाद अमृत डांगे, काल मार्क या विचारांचा प्रभाव होता. फकीरा त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे .अशा प्रकारच्या थोर पुरुषांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणात आणावा आणि समाजाप्रती कृतज्ञता करावी असा मोलाचा सल्ला मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दिला या कार्यक्रमाचे संचालन डॉ. गुडधे यांनी केले तर आभार प्रा. विरुडकर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीते साठी प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले