अन्न व औषध विभागाला सणासुदीच्या दिवसात आली जाग ! अन: बारावी महिने भेसळचा महामार !chandrapur

 



अन्न व औषध विभागाला सणासुदीच्या दिवसात आली जाग !    अन: बारावी महिने भेसळचा महामार !

दिनचर्या न्युज :- 

चंद्रपूर :- 

 चंद्रपूर जिल्ह्यात मिठाई उत्पादक विक्रेते व हॉटेल व्यवसायिक ज्यांना सणासुदीच्या कालावधीत भेसळ युक्त पदार्थ विकू नये म्हणून या विभागाने  माध्यमाच्या माध्यमातून जनजागृती  सुरू केली आहे. एरवी बारावी महिने  हा विभाग कुंभकर्णाच्या झोपेत असतो ती काय? कारण जनतेला विकणारी बाराही महिने मिठाई व अन्नपदार्थ जसे की, खवा/ मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल/वनस्पती इत्यादीची  वस्तू हमखास  स्वीट मार्ट  व  हॉटेलमध्ये भेसळयुक्त वापरल्या जातात. अनेक वेळा या विभागाकडून अशा तक्रारी आल्या असताना सुद्धा  तात्पुरती कारवाई करून  संबंधित भेसळ विक्रेतांना  रान मोकळे करताना दिसून आलेत आहेत. मागच्याच वर्षी गोल बाजारातील एका स्वीटमार्टवर कारवाई करून  लाखो रुपयांचा   भेसळ खवा या विभागाने पकडला होता. परंतु  या  विभागाने  थातूरमातूर कारवाई करून  पुन्हा जैसे थे अशी स्थिती निर्माण झाली.

 आता सणासुदीच्या काळात मिठाई उत्पादक विक्रेते आणि हॉटेल व्यवसायिक  यांनी दक्षता घ्यावी अशी जनजागृती सुरू केली.

 मुळातच बाराही महिने झोपी  गेलेल्या या अन्न व औषध विभागाला सणासुदीच्या दिवसात  जाग आली !    अन: बारावी महिने भेसळचा महामार  सुरू असतो,  तेव्हा !

आता पावसाळ्यात मेंडकासारखा  रंग बदलणारा विभागाला जाग येणे साहजिकच आहे. 

 या व्यवसायिकांच्या आस्थापनाच्या परिसरात, अस्वच्छता, कच्चे अन्नपदार्थ,  अनेक हॉटेलमध्ये  रस्त्यावर उघडे पदार्थ ठेवून विक्री केले जातात. वारंवार तेच तेल खाद्यपदार्थासाठी वापरले जातात.  अनेक ठिकाणी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी योग्य अशा पाण्याचा वापर केला जात नाही. अनेक दिवसापासून अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवल्या जात नाही. त्यांना ते अन्नपदार्थ किती दिवसाचे आहे हे सुद्धा कळत नाही.

 आता अनेक ठिकाणी फुट ग्रेट खाद्यपदार्थाच्या स्टॉल विक्री सुरू असतात.  बंगाली मिठाई 24 तासाच्या आत ग्राहकांना विकणे  अनिवार्य असताना  कित्येक दिवस ती त्या स्वीट मार्ट मध्ये  कोंबल्या जाते. आणि तीच ग्राहकाच्या माती मारल्या जातात. परंतु या विभागाला साधी  एखाद्या ठिकाणी जाऊन  कारवाई करण्याचे धाडस सत्र सुद्धा करण्याचे दिसून येत नाही.

 अनेक हॉटेलमध्ये मिठाई बनवताना त्या व्यक्तींच्या हा डोक्यात टोपी, मास्क , हातमोजे, दिसून येत नाही.

 कुठल्याही आस्थापनेत अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची  

वैद्यकीय तपासणी कदाचित झाली असेल असे तर वाटत नाही?  अन्न व औषध विभागाच्या  नियमानुसार मिठाई उत्पादक विक्रेते,व हॉटेल व्यवसायिक यांनी  कधी सूचनेचे पालन केले असेल का?  कारण या विभागाचे संबंधित विक्रात्यावर  कारवाईच होत नसल्याने   सर्रास  जिल्ह्यात अशा भेसळयुक्त  अन्नपदार्थ विक्रेत्यांना वाव मिळत आहे.

    या विभागाने  सणासुदीच्या काळाबरोबरच वर्षभर जर होणाऱ्या भेसळयुक्त पदार्थावर कारवाई ची दक्षता घेतल्यास.  मिठाई व अन्नपदार्थाच्या सेवनामुळे विषबाधा सारखे अप्रिय घटना घडणार नाहीत. तसेच अन्नपदार्थाच्या दर्जा विषयी ग्राहकांना संभ्रम राहणार नाही. मात्र 'कुंपणच शेत खात असेल तर!  रखवाली करणार कोण?