चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे स्व.प्राचार्य वसंतराव दोंतुलवार जयंती आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा
दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
दिनांक 8/ 8/ 2025 रो शुक्रवारला चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे स्व. प्राचार्य वसंतराव दोंतुलवार आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोंड सर होते तर प्रमुख अतिथी डॉ. नरवाडे डॉ गिरिपूंजे ,डाॕ .उगेमुगे होते मान्यवरांनी स्व. प्राचार्य वसंतराव दोंतुलवार चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूरचे संस्थापक यांच्या जीवन कार्याविषयी ची माहिती करून दिली 1999 मध्ये चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली प्रथम पोंभुर्णा आणि घुग्घूस येथे लावलेले शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. आज या संस्थेमध्ये 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे. या संस्थेतील विद्यार्थी शिक्षण घेऊन प्रगतीपथावर आहे . या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ऑनलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले यामध्ये पाचशेच्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला डॉ.उगेमुगे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी क्रांती दिनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. गुडधे यांनी तर आभार प्रा. विरटकर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले