सेवानिवृत्तांनी पुढील कार्यकाळ समाजसेवेत लावावा : संतोष अतकारे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
पतसंस्थेच्या माध्यमातून प्रत्येक सभासदास वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीस हातभार लागत आहे. संचालक मंडळाच्या कार्याचे मुल्यांकन उत्तम असून लाभांश हा मुच्युअल फंडाच्या बरोबरीने वाटप केला जात आहे ही बाब उल्लेखनीय आहेतसेच पतसंस्थे मार्फत केला जाणारा सेवानिवृत्तांचा सपत्निक सत्कार, गुणवंत विद्यार्थी व गुणवंत खेळाडूंचा गौरव प्रशंसणीय बाब आहेअसे प्रतिपादन मा. बापु येळे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनिकरण विभाग, चंद्रपूर यांनी ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी म्हणून केले. सदर वार्षिक सर्वसाधारणसभेच्या प्रास्ताविका तून पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष अतकारे यांनी पतसंस्थेच्या सन १९९४ सुरु झालेल्या वाटचालीवर प्रकाश टाकला. संस्थेच्या कार्याचा परीचय करुन देत संस्थेचे कर्ज विषयक धोरण कसे असायला हवे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. सेवानिवृत्तांनी पुढील कार्यकाळ समाजसेवेत लावावा असे सांगितले. सभासदांची भुमिका ही | संस्थेप्रती सकारात्मक असायला हवी तसेच पुढील कालावधीतील यशस्वी वाटचालीसाठी प्रत्येक सभासदांनी सहकार्य करण्याची विनंती केली. या सभेचे सभाध्यक्ष म्हणून मा. अमित चहांदे, यांनी स्थान भुषवून संस्थेच्या कार्यकारणीच्या उत्कृष्ठ कार्यावर प्रकाश टाकून पुढील काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी, संचालक मंडळ तसेच पतसंस्थेच्या सभासदांच्या हस्ते वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून सेवानिवृत्त सभासद यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, साडीचोळी देवून सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व एक फोल्डर फाईल देवून गौरविण्यात आले आणि गुणवंत खेळाडू यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले त्यात २७
सेवानिवृत्त सभासद, ८ गुणवंत विद्यार्थी व ३ गुणवंत खेळाडू यांचा समावेश होता. सुत्रसंचालन प्रिती मुधोळकर यांनी तर आभार अखिल राईंचवार यांनी मानले तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष अतकारे, उपाध्यक्ष दिपक हिवरे, सचिव योगेश धकाते, खजिनदार दर्शन गहुकर, राजेश पिंपळकर, हर्षपाल रामटेके, सचिन साळवे, अखिल राईंचवार, धिरज दहेगांवकर, सौ. योगिता मडावी, सौ. प्रिती मुधोळकर यांची मंचावर उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास पतसंस्थेच्या ३००-३५० सभास दांचा सहभाग होता. त्यात महीला सभासदांचा बहुसंख्येने सहभाग दिसून आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्था पक अमन नंदनवार, लिपीक चंद्रशेखर निवस्कर, गणेश तरारे यांनी परिश्रम घेतले.