कुणाल फुलझलेनी स्वतःची पर्वा न करता वाचवले एका कुटुंबाचे प्राण
दिनचर्या न्युज :-
पुणे -दिनांक 5.8.2025* हिंजेवाडी फे३ रोड मध्ये काल दिनांक 5.8.2025 ला एका कारला आग लागून धूर निघत असल्याचे दिसून आल्याने त्याच रोडवरुन जाणारे मुळचे चंद्रपूर येथील रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे cognizant multi national company मध्ये software engineer म्हणून कार्यरत असलेले श्री कुणाल नितीन फुलझेले या तरुणाने प्रसंगावधान राखून व स्वतः च्या जिवाची पर्वा न करता जळत्या कार मधून १ फॅमिली ला वाचवले. स्वतः कार ची आग वीजवली आणि ३ वर्ष्याच्या लहान मुलीला आणि तिच्या आई बाबाला त्यांनी जळत्या कार मधून सुरक्षित बाहेर काढले व पोलीसांना सुचना दिली. यात सदर तरुण किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी कुणाल फुलझेले यांचे कौतुक केल जात असून ते चिमूर येथील गट विकास अधिकारी यांचा मुलगा असून तो पुणे येथे एका सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून कंपनीत काम करीत आहे. त्याच्या या समय सूचकता आणि कर्तव्यदक्ष अशा कार्याचा सर्व स्तरातून
कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
आणि त्याच्या सारखा जागृत नागरिक बनावं वेळप्रसंगी एखाद्या संकटात असलेल्या माणसाला माणुसकी म्हणून आपले काहीतरी देणे आहे याची जाणीव करून कुणालाने दिली.
