अवध्या दोन दिवसात गुन्हयातील आरोपी अटक चिमूर पोलिसांची मोठी कारवाई
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (चिमूर) :-
मौजा कन्हाळागांव, ता. चिमुर येथील घरफोडीचा गुन्हा उघड अवध्या दोन दिवसात गुन्हयातील आरोपी अटक व चोरीस गेलेला एकुण १,४०,०००/- रु. चा माल जप्त पोलीस स्टेशन चिमुर ची कामगिरी
दिनांक ११/०८/२०२५ रोजी यातील तक्रारदार नामे रामदास वाघमारे रा. कन्हाळगांव ता. चिमूर हा त्याचे पत्नीसह नेहमी प्रमाणे शेतात सकाळी ९:०० वा. दरम्यान कामा करीता जावुन सायं ७:०० वाजता घरी परत आला असता त्याचे घराचा मागचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने बघितले असता कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्याचे घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने चोरुन नेले आहे. यावरुन पोलीस स्टेशन चिमूर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात, पोलीस स्टेशन चिमुर येथील गुन्हे शोध पथकाने
भेट देवुन आजुबाजचे परिसरात गोपनिय बातमीदार नेमुन गुन्हयाचा कसोशीनेतपास करुन गुन्हयातील आरोपी नामे रोशन बबन वाघमारे वय ३३ वर्ष रा.कन्हाळागाव यास अटक करुन त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली मालमत्ता सोन्याचे दागीने व नगदी असा एकुण १,४०,०००/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हा अवध्या दोन दिवसाचे आंत उघडकीस आणुन चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
सदरची कामगरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. चिमूर चे पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सफौ विलास निमगडे, पोअं रोहीत तुमसरे, सचिन खामनगर, सोनु, सचिन साठे सर्व पोस्टे चिमूर यांनी केली आहे.
दिनचर्या न्युज :-