चोरून नेलेल्या मोटरसायकलचे केले तुकडे, अन्: शहर पोलिसांच्या हाती चोर लागले !




चोरून नेलेल्या मोटरसायकलचे केले तुकडे, अन्: शहर पोलिसांच्या हाती चोर लागले !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे यातील फिर्यादी नामे महेश गौतम काळे वय ३६ वर्ष, धंदा मजुरी रा. माता नगर भिवापुर वार्ड चंद्रपुर यांनी दिनांक २०/०८/२०२५ रोजी चंद्रपुर शहर येथे तकार दिली की, फिर्यादीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क. एम.एच. ३४, यु ५२१४ हि रात्रों आपले घरासमोर असलेल्या रोडचे बाजुला ठेवली असता, फिर्यादीने सकाळी उठुन आपली मोटार सायकल पाहिली असता ती दिसली नाही. तेव्हा आपले वाहनाचा आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळाली नाही. तरी फिर्यादीची मोटार हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क. एम.एच. ३४, यु ५२१४ हि किं. अं. १५,००० रू. ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अप क. ६०४/२५ क. ३०३(२), ३१७ (२), ३२४(४), ३ (५) वि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.


सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान गोपणीय माहिती काढली असता, सदर गुन्ह्यातील वाहन हे यातील नमुद आरोपी १) सुमीत शांताराम अमराजवार, वय २८ वर्ष, धंदा मजुरी, रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर २) तनवीर कदिर बेग, वय २५ वर्ष, धंदा मजुरी, रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर यांनी मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले व आरोपी क. ३) सत्तार शम्मी खान, वय ३२ वर्ष, धंदा मजुरी रा. पडोली ता. जि. चंद्रपुर, याने सदर मोटार सायकलचे ग्रॅन्डर कटर मशीननी तुकडे केले काही तुकडे स्वतः जवळ ठेवले व याातील काही तुकडे आरोपी क. ४) जाकीर कासम शेख वय ३१ वर्ष, धंदा मजुरी रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर यांचेकडे दिले. अशा प्रकारे सदर आरोपी यांचेकडुन १) अप क. ६०४/२५ क. ३०३(२), ३१७(२), ३२४(४),३(५) बि.एन. एस. मधील हिरो होंडा स्प्लेंडर गाडी कं. एम.एच. ३४, यु ५२१४ मोटार सायकलचे तुटलेल्या मोड तोड केलेले स्थितीतील तुकडे किं. १५,००० रू. २) एक जुनी वापरती डिलक्स कंपणीची मोटार सायकलचे तुटलेल्या मोड तोड केलेले स्थितीतील तुकडे चेसिस कं. 02K5TM-090747 किं. ४०,००० रु. ३) एक लोखंड कापन्याची ग्रॅन्डर कटर मशिन किं. २००० रू. असा एकुण ५७,००० रू. चा माल जप्त करण्यात आले.

चोरून नेलेल्या मोटरसायकलचे केले तुकडे, अन्: शहर पोलिसांच्या हाती चोर लागले !

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पो.नि. निशीकांत रामटेके पो.स्टे. चंद्रपुर शहर, यांचे नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे व त्यांच्या डि.बी. पथक कर्म मपोहवा. भावना रामटेके, पोहवा. सचिन बोरकर, संजय धोटे, लक्ष्मण रामटेके, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खरवार, पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सारिका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे. सदरचा तपास कपुरचंद खरवार मेजर करित आहे.