छोट्या मटक्याच्या जखमेसाठी नैसर्गिक उपचारच वरदान!! T-126 नर वाघाच्या आरोग्य स्थिती....!



छोट्या मटक्याच्या जखमेसाठी नैसर्गिक उपचारच वरदान!!

T-126 नर वाघाच्या आरोग्य स्थिती....!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बप्पर क्षेत्रातील छोटा मटका ( सीएम)टि१२६ नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघाची सध्या त्याच्या दुखापती बद्दल माध्यमासह सर्वीकडे चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी सीएम झुंजीत जखमी झाला होता. दिवसेंदिवस छोट्या मटक्याला जखमेमुळे त्रास होत असल्याचे बोलले जात आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार जंगलातील प्राणी हे त्यांच्या नैसर्गिक उपचारानेच अधिका अधिक लवकर बरे होतात. निसर्गात संचार करताना त्यांना आपल्या उपजीविकेचे आणि येणाऱ्या पिढीचे एकमेकांवर वर्चस्वासाठी अस्तित्व हे अवलंबून असते. त्यामुळे या वन्य प्राण्याचे जीवन हे नैसर्गिक रित्याच जगणे -मरणे,त्याच्या झालेल्या जखमेसाठी नैसर्गिक उपचारच वरदान!  असे मानले जाते.

 एक-दोन वर्षाच्या असलेल्या  वन प्राण्यासाठी  औषध उपचाराची  किंवा त्यांच्या देखरेखीची वन विभागाकडून खास तोवर दखल घेतल्या जाते. प्रत्येक वन प्राणी वयस्कर झाल्यास त्यांना नैसर्गिक रित्या जीवन जगावह लागत असते. जनावरावर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून उपचार करायचे की नाही याचा निर्णय घेतला जाते.  झुंजीत छोटा मटकाला झालेली दुखापत ही बुद्धपौर्णिमेच्या दिवशी 'ब्रह्मा' वाघाच्या लढाई झाली. त्यात ब्रह्मा वाघ ठार झाला, मात्र छोटा मटका घायाळ झाला. पायाला फार मोठा चिरा पडल्याने रक्तप्रवाह सुरू असल्याचे पर्यटकांनी पाहिले. तो आपल्या जीवनाशी संघर्ष करीत आहे.

 छोटा मटका हा छोटी तारा आणि मटका सूर यांच्या पोटी जन्मलेला वाघ हा ताडोबा साठी पैसे कमवणारा पर्यटकांना आकर्षित  करीत,कोठावधी उत्पन्न मिळवून देणारा ठरला.

पण त्याचा वारसा केवळ पर्यटनातच नाही तर रक्त आणि युद्धातही कोरलेला आहे. गेल्या चार वर्षांत, छोटा मटकाने अनेक प्रतिस्पर्धी मोगली, बाली, ताला, बलराम, बजरंग आणि अलिकडेच ब्रम्हा यांना हरवले आहे,

 ब्रम्हाचा या संघर्षात  जीव गेला, परंतु या चकमकीमुळे छोटा मटकाचा  पाय जखमी झाला. 

 लंगड्यापणात कोणतीही सुधारणा झालेली नाही आणि अलिकडच्या दुखापतीमुळे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. जर त्यामुळे त्याची शिकार करण्याची क्षमता कमी झाली किंवा पशुधनाची शिकार आणि गावकऱ्यांशी संघर्ष वाढला तर हस्तक्षेप करणे अपरिहार्य ठरते.

 व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) वन्य वाघांना पकडण्यास आणि त्यांच्यावर उपचार करण्यास प्रतिबंधित करते जोपर्यंत त्यांचे अस्तित्व धोक्यात येत नाही. अधिकारी नैसर्गिक उपचारांवर अवलंबून राहून कमीत कमी मानवी हस्तक्षेप पसंत करतात.

 पण क्षेत्रातील सूत्रांचा असा विश्वास आहे की छोटा मटकाच्या प्रकरणात कारवाईची आवश्यकता आहे. "त्याच्या लंगड्यापणात कोणतीही सुधारणा झालेली नाही आणि अलिकडच्या दुखापतीमुळे गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. जर त्यामुळे त्याची शिकार करण्याची क्षमता कमी झाली किंवा पशुधनाची शिकार वाढली आणि गावकऱ्यांशी संघर्ष झाला तर हस्तक्षेप अपरिहार्य ठरतो," 


ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T-126 नर वाघाच्या आरोग्य स्थितीबाबत

   दिनांक 12 मे 2025 रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे खडसंगी, बफर परिक्षेत्रा अंतर्गत निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्र. 63 मधील उमरीखोरा परिक्षेत्रात T-126 व T-158 या दोन वाघांमध्ये तीव्र संघर्ष झाला. या झुंजीत T-158 वाघाचा मृत्यू झाला आणि T-126 गंभीर जखमी झाला. 

त्यानंतर वन विभागाने ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कॅमेरे आणि गस्ती पथकांच्या साहाय्याने वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले.

          आकस्मिक परिस्थिती पाहता NTCA च्या मानद कार्यपद्धतीनुसार जखमी T-126 वाघास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रशिक्षित RRT कडून बेशुद्ध करून त्याचेवर त्याच ठिकाणी उपचार करून तात्काळ सोडण्यात आले. दिनांक 13 जून 2025 पासून T-126 वाघाची स्थिती सुधारण्यास सुरुवात झाली. 

          दिनांक 14 जुलै 2025 रोजी T-126 वाघाने बफर क्षेत्रालगत प्रादेशिक वनक्षेत्रात 4 गायींवर हल्ला केला. यामध्ये दोन गाई ठार तर दोन जखमी झाल्या. एकाच दिवशी 4 गायींवर हल्ला केल्यामुळे T-126 वाघाचे पायाची जखम वाढली. ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे वरिलप्रमाणे स्थिती टिपली गेली आणि त्याच्या उजव्या पायाला सूज असून तो तीन पायांवर चालत असल्याचे स्पष्ट झाले.

T-126 वाघाने केलेल्या पशुहानीचा तपशील :

 15/07/2025-2 गाई ठार, 2 गाई जखमी

16/07/2025- गाय ओढतांना ट्रॅप कॅमेऱ्यात दिसला

  28/07/2025- गोराठार

 14/08/2025- 1 गाय ठार केली

T-126 वाघ जखमी असल्याने कोणतीही पशुहानी अथवा मानव हानी टाळण्यासाठी तसेच वाघ लवकर सुदृढ होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे;

1. वाघाच्या देखरेखीकरिता स्वतंत्र गस्त पथक तयार करणे. त्यात STPF, RRT, PRT आणि चिमूर प्रादेशिक    

   क्षेत्रातील मनुष्यबळाचा समावेश करणे.

2. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनw दर आठवड्याला तसेच आवश्यकतेनुसार वाघाचे निरीक्षण करून अहवाल सादर   

   करणे. 

3. वाघ वावरण्याच्या क्षेत्रातw विजेच्या धोक्याची शक्यता टाळण्यासाठी गस्तीचे नियोजन काळजीपूर्वक करणे. 

4. वाघाच्या हालचालींचा GIS नकाशा तयार करून वेळोवेळी अद्ययावत करणे व त्यानुसार वाघाचे सनियंत्रण   

   करणे. 

5. वाघामुळे झालेल्या पशुहानीच्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे व नुकसान भरपाई अदा करणे.

6. स्थानिक लोकप्रतिनिधी व गावकरी यांचे सोबत संवाद कायम ठेवणे.

7. मानद वन्यजीव रक्षक व स्वयंसेवी संस्था (NGO) यांना T-126 संदर्भात वेळोवेळी माहिती देणे.

8. दररोज निरीक्षण अहवाल सादर करणे आणि साप्ताहिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणे. 

9. सहाय्यक वनसंरक्षक, कोलारा यांना या सर्व कार्यवाहीसाठी 'नोडल अधिकारी' म्हणून जबाबदारी देणे.

10. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मानक कार्यपद्धतीनुसार जखमी वाघाच्या हालचालीवर देखरेख   

    व तांत्रिक मार्गदर्शनासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये वन विभाग, पशुवैद्यकीय   

    अधिकारी, स्वयंसेवी संस्था, मानद वन्यजीव रक्षक आणि स्थानिक प्रतिनिधींचा समावेश असून, T-126   

    वाघाच्या उपचार किंवा अन्य उपाययोजनांबाबत ठोस शिफारसी करण्याचे उद्दिष्ट आहे.

          ही कार्यपद्धती T-126 वाघाच्या आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

         वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या SOP चे तरतुदीनुसार जखमी वाघ T-126 बाबत आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सोशल मिडीयावर आलेल्या अप्रमाणित अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

(डॉ. प्रभु नाथ शुक्ल)                                                             वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,                                                                                            ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प, चंद्रपूर(डॉ. प्रभु नाथ शुक्ल)