अभियंता दिनी, अभियंत्याची खोली क्र. 107 मध्ये दारू पार्टी !




अभियंता दिनी, अभियंत्याची खोली क्र. 107 मध्ये दारू पार्टी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणारे ,अशा महान व्यक्तीचा 15 सप्टेंबर राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येते .या पार्श्वभूमीवर मात्र चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंते .. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह असलेल्या शासकीय वसंत भवन येथे रूम नंबर 107 मध्ये एकच प्याला ढोकस्त होते. याची खबर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना लागतात त्यांनी पत्रकारांना घेऊन वसंत भवन विश्रामगृहात धाड टाकली. असता त्या ठिकाणी सात अभियंते दारूवर ताव मारत असताना आढळून आले. आपची धडक होताच सर्व अभियंते इकडे तिकडे जागा मिळेल तिकडे लपत होते. कुणी बाथरूम मध्ये लपलेत तर कुणी जिथे लपता येईल तिथे लपले. कुणीही आपली ओळख सांगायला तयार नव्हते. मात्र एकाचे ओळखपत्र मिळाल्याने तो जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा अभियंता असल्याचे समोर आल्याने हे सर्व अभियंते राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने ओल्या पार्टीवर चांगलेच रंगले होते.
अशा विडीओ शोशल मिडीयावर चांगलाच वायरल होत आहे.
मात्र यामुळे अभियंता दिनाची, आणि जिल्हा परिषद च्या प्रशासकीय वसंत भवनाच्या विश्रामगृहाची चांगली चर्चा होत आहे.
संबंधित विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर काय कारवाई करतात  याकडे लक्ष लागले आहे.