नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरणार !




नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरणार !

ऑनलाइन मीटिंग द्वारे पदाधिकाऱ्याची मीटिंग

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

दिनांक 20/9/2025 रोजी अध्यक्ष महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघ तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ मा.श्री.कल्याणरावजी दळे साहेब यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटींग घेण्यात आली नाभिक व धोबी-परिट समाजाला अनुसूचित जातीमध्ये टाकण्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाने आपली मते मांडली आहेत आपल्या जवळ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन समीतिने नाभिक समाजाचा केलेला सर्वेक्षण अहवाल उपलब्ध आहे तसेच 26 मार्च 1979 चे शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेला अहवाल उपलब्ध आहे इतर राज्यात आपन कोणत्या प्रवर्गात येतो त्याची माहीती सुद्धा उपलब्ध आहे या व इतर माहीतीच्या आधारे आपन लवकरच शासन दरबारी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत आंदोलनाची दिशा ठरविण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे याची समाजाणे नोंद घ्यावी आणि न्याय पदरी पाडुन घ्यायचाअसेल तर आंदोलनाची तयारी ठेवावी

नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. बलुत्या-आलुत्यामधील आमचा नाभिक समाज असेल, धोबी समाज असेल, बलुत्या -आलुत्या वाल्यांना एससी आरक्षण मिळावं. कारण देशातील अनेक राज्यांमध्ये ते एससीमध्ये येतात. आणि जर या सर्व गोष्टी कोणी एससी, मध्ये देणार असतील तर आम्हाला आनंद आहे, असं असंही दळे यांनी म्हटलं आहे. सरकार सातत्याने मायक्रो ओबीसी असलेल्या समाज घटकावर अन्याय करत आले आहे. त्यामुळे आता समाजाला आपल्या न्याय पदरी पाडून घेण्यासाठी आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल असे ते बोलले