तहसील कार्यालयासमोर महसुल सेवकांचा चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळण्यासाठी बेमुदत आंदोलन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा व विविध मागण्या घेऊन चंद्रपूर तहसील कार्यालय समोर विदर्भ महसूल सेवक संघटनांनी बेमुदत काम बंद आंदोलन, धरणे आंदोलन साखळी उपोषणाचा इशारा संघटना संघटनांनी दिला आहे. महसूल सेवक (कोतवाल )अनेक वर्षापासून आपल्या हक्कापासून वंचित आहेत. महसूल सेवक संघटना संघटनांनी दिनांक १०/९/२०२५ काळ्या फिती लावुन काम करणे सुरू केले होते.दिनांक ११/९/२०२५ तालुका स्तरावर एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करून सरकारला इसारा देत दिनांक १२/९/२०२५ पासुन मा. महसुल मंत्री महाराष्ट्र शासन यांचे क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात बेमुदत काम बंद / धरणे आंदोलन तसेच साखळी उपोषण करण्यात येत असल्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
या संदर्भात निवेदन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे भोजराज चौधरी, संदीप थाटे, निलेश नांदे, प्रदीप मेश्राम, प्रकाश मडावी, कुंदन शिंदे, ज्ञानेश्वर वाढई, शंकर निंदेकर, यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील महसुल सेवक (कोतवाल)हा कणा आहे. महसूल विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना, शासन स्तरापासुन ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरु असणाऱ्या महत्वाच्या योजना इत्यादींची अमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंतः व्यवस्थित रित्या राज्यातील महसूल यंत्रणा, मा. जिल्हाधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते.
नहसूल विभाग हा राज्य शासनाचाः क्षेत्रीय योजना राबविणाच, सर्वात प्रमुख विभाग आहे. महसूली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे. कृषी गटांना शासनाच्या विविध योजना. अभियान मोहिमांचे समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका राजशिष्टाचार विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक विगर १८६८ महसूली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते, त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांची निगडित असलेला. आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.
मा. महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याबाबत. मा.महसूल मंत्री महाराष्ट्र शासन (मार्फत मा.विभागीय आयुक्त,, नागपूर विभाग नागपूर) यांना दिनांक. 3/9/2025 रोजी दिलेले
क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्प्त महसुली कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरिता पार पाडत असतो. परंतु शासनाने मागण्या मान्य केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) यांना इतर महसूल कर्मचान्या प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांचा वरील अन्याय दूर करावा . अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

