चंद्रपूर जिल्हा परिषद वर्ग एक व वर्ग दोन संवर्गातील ३१५ रिक्त पदामुळे अडचणी ! अधिकारी ,कर्मचाऱ्यांची काम करताना होतोय दमछाक !




चंद्रपूर जिल्हा परिषद वर्ग एक व वर्ग दोन संवर्गातील ३१५ रिक्त पदामुळे अडचणी !

अधिकारी ,कर्मचाऱ्यांची काम करताना होतोय दमछाक !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्षापासून वर्ग एक व वर्ग दोन च्या संवर्गातील पदे रिक्त असल्यामुळे तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. शासनाने मागील काही वर्षापासून पदभरती केली नसल्याने चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये वर्ग एक सर्व विभागातील 131 पदे रिक्त असून, वर्ग दोन सर्वांगातील सर्व विभागातील एकूण 184 पदे रिक्त आहेत. असे सर्व वर्ग एक व दोन वर्गातील मिळून जिल्हा परिषद मध्ये 315 सर्वांगातील रिक्त पदामुळे कामकाजावर फार मोठा परिणाम झाला आहे. अधिकारी ,कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. मागील चार वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये प्रशासक राज सुरू आहे. अशातच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कामकाजावर  चांगलाच परिणाम होत आहे.

सामान्य प्रशासन विभागात म.वि.से. वर्ग एक मंजूर पदे 22 असून कार्यरत पदाची संख्या 14 आहे. या ठिकाणी 8 पदे रिक्त आहेत. सामान्य प्रशासनातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एक तर उपजिल्हा कार्यक्रम समन्वय नरेगा येथील एक पद रिक्त असून गट विकास अधिकारी उच्च श्रेणी तील सहा तालुक्यातील  जिवती गोंडपिपरी, मूल ब्रह्मपुरी कोरपणा सावली  येथे पदे रिक्त आहेत. तर वर्ग दोनची पदे   अधिव्याख्याता ग्रासे प्र सिंधुबाई येथील खाली आहे. व  महिला व बालविकास चिमूर वगळता सर्व 14 तालुक्यात जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा वर्ग एकच्या  सहाय्यक जिल्हा  आरोग्य अधिकारी व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी दोन जागा खाली आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट वर्ग दोन च्या  वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद केंद्र चंद्रपूर एक, तालुका वैद्यकीय अधिकारी

जिल्ह्यातील  जिवती ,नागभीड, गोंडपिपरी व्यतिरिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी 83  पदे रिक्त असल्याने कंत्राटी स्वरूपात ऐसी पदे भरण्यात आली आहेत त्यात तीन पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब मध्ये 21 पदे कंत्राटी  तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात आली  आहे.

सामान्य राज्यसेवा आरोग्य वर्ग दोन मध्ये गेडाम यांच्या बदलीनंतर सांख्यिकीक अधिकारी चे पद खाली आहे.

सामाजिक न्याय विभागात वर्ग एक मधील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे   पेंदाम यांच्या सेवा नियुक्तीमुळे   पद रिक्त आहेत.

कृषी सेवा येथे संख्या पाच असून कार्यरत पदाची संख्या ही पाच आहे. शिक्षण सेवा प्राथमिक एकूण मंजूर पद संख्या 36  असून कार्यरत पदाची  आहे. उप   शिक्षण अधिकारी  (प्राथमिक) ठाकरे यांच्या सेवानिवृत्तीमुळे दोन पदे अधीक्षक (शालेय पोषण आहार) 11 पदे लेखाधिकारी पोषण आहार) एक डावले यांच्या सेवानिवृत्तीनंतर. गट शिक्षण अधिकारी  जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात रिक्त असल्यामुळे  शिक्षण विभागावर फार  मोठी अडचण निर्माण झाली आहे. वरोरा राजुरा चिमूर ब्रह्मपुरी चंद्रपूर येथे पाच मुख्याध्यापक पदे रिक्त असून एकूण जिल्ह्यातील 34 रिक्त पद आहेत.

शिक्षण सेवा माध्यमिकह मंजूर पत चार असून एक पद कार्यरत असून तीन पदे शिक्षण अधिकारी माध्यमिक2 आणि उपशिक्षणाधिकारी माध्यमिक1  असे तीन पदे रिक्त आहेत. शिक्षण सेवा निरंतर एक आणि दोन वर्गातील एक एक पद रिक्त आहे. वित्त व लेखा मध्ये वर्ग एक मध्ये दोन जागा वर्ग दोन मध्ये एक जागा अशा एकूण दोन रिक्त जागा लेखा अधिकारी1 एक जागा तर उपमुख्य लेखा वित्त अधिकारी  अशी एक जागा  असून या विभागात 2  रिक्त पदे खाली आहेत.

तांत्रिक सेवा बांधकाम विभागात उपअभियंता बांधकाम राजुरा ,मुल ,जिवती , पोंभुर्णा , चिमूर अशा पाच जागा खाली असून 5  जागेवर वर्ग एकच्या पद भरण्यात आले आहेत.

तांत्रिक सेवा (लघु पाटबंधारे विभाग) मंजूर पदसंख्या दहा असून तिथे पाच पदसंख्या कार्यरत.  जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्याची एक, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी एक, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तीन अशा पाच जागा रिक्त आहेत.

तांत्रिक सेवा (पाणीपुरवठा) वर्ग एक ची व वर्ग दोन मधील आठ जागा विभागीय कार्यालयात रिक्त असून पदसंख्या 22 आहे. कार्यरत पदसंख्या 14 असून बाकी आठ जागा खाली आहेत. पशुसंवर्धन सेवा विभागात वर्ग एक च्या १०८ जागा  तर वर्ग दोन मधील पशुधन विकास अधिकारी गट ब 11 जागा अशा एकूण 119 जागा रिक्त आहेत.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्ग एक मध्ये व वर्ग दोन मध्ये३  जागा असून त्यात सहाय्यक प्रकल्प अधिकारी (पशुसंवर्धन) सहाय्यक प्रकल्प अधिकारी  रोजगार, उपअभियंता, लेखा अधिकारी अशा एकूण चार जागा  रिक्त आहेत. अशी परिस्थिती मागील काही वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये असल्याने पंचायत समिती स्तरावरील,  तसेच जिल्हा परिषद मध्ये   रिक्त पदे असल्यामुळे   नागरिकांचे वेळेवर काम होत नसल्याची ओरड होत आहे. याकडे राज्य सरकारने त्वरित लक्ष देऊन पदभरती करावी अशी मागणी आता होत आहे.