अखेर त्या महीलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला केले जेलबंद,
Dincharya news
chandrapur
दिनचर्या न्युज
चि मूर वनपरिक्षेत्रातील भिशी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बीट मध्ये लावारिस चौरस्ता येथील विद्या कैलास मसराम वय 40 वर्ष महिलेला गुरुवारी सकाळी शेतात निंदन करीत असताना ठार केले. त्याचे पडसाद आणि या परिसरातील गावकऱ्याचा आक्रोश पाहता नागरिकांनी वाघाला जेल बंद करावे अशी मागणी केली होती.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. वाघाला पकडले जात नाही तोपर्यंत वन विभागाच्या गाड्यांना गावातून जाऊ देणार नाही, अशी घोषणा ग्रामस्थांनी केली. तद्वतच वनरक्षक बोरकर याला तात्काळ हटवण्याची मागणी सुद्धा केली होती.
लावरी गावाजवळ महिलेवर हल्ला करणाऱ्या वाघाला शुक्रवारी (१९) रात्री ८ वाजता वन विभागाच्या पथकाने पकडले.
लोकांच्या भावना लक्षात घेऊन, वन विभागाने तात्काळ कारवाई केली. गुरुवारपासून वाघीण निरीक्षणाखाली होती. शुक्रवारी वाघाला चारा ( गोरा) बांधण्यात आला. वाघीण शिकार करण्यासाठी येताच, वन विभागाचे पशुवैद्य डॉ. रविकांत खोब्रागडे आणि शार्पशूटर अजय मराठे यांनी त्याला बेहोश केले आणि पिंजऱ्यात जेलबंद केले.
त्यानंतर वाघाला चंद्रपूर येथील टीटीसी सेंटरमध्ये पाठवण्यात आले. या कारवाईदरम्यान ब्रह्मपुरी वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, ब्रह्मपुरी वन विभागाचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा आणि इतर वन कर्मचारी उपस्थित होते.