दिपाली माशीलकर यांच्या हस्ते लोहारा येथे आदी कर्मयोगी अभियानांतर्गत सेवा केंद्राचे उद्घाटन



दिपाली माशीलकर यांच्या हस्ते लोहारा येथे आदी कर्मयोगी अभियानांतर्गत सेवा केंद्राचे उद्घाटन

दिनचर्या न्यूज:-

चंद्रपूर:-

आज दिनांक 22/09/2025 रोजी आदी कर्मयोगी अभियानांतर्गत आदी सेवा केंद्राचे उद्घाटन आदरणीय दिपाली माशीलकर संचालक जनजातीय मंत्रालय भारत सरकार यांच्या हस्ते लोहारा गावात संपन्न झाले.सदर कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माननीय पुलकित सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,माननीय विकास राचल्लावर प्रकल्प अधिकारी आदिवास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर, माननीय संगीता भांगरे गट विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर तथा गावातील प्रथम नागरिक सरपंच माननीय किरणताई चालखुरे, उपसरपंच माननीय शालिक मरस्कोहले, माननीय विजय यारेवार विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती चंद्रपूर तथा ग्रामपंचायत सदस्य ,

गावातील सामाजिक कार्यकर्त माननीय मनोहर मेश्राम, श्री.अमोल शींदे आदीवासी प्रकल्प विभाग,गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचतगट,वनहक्क समिती , वनव्यवस्थापन समिती, आरोग्य विभागातील अधिकारी,गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. सर्वप्रधम कार्यक्रमाच्या उद्घाटक दिपाली मॅडम यांच्या हस्ते आदी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.दिपाली मॅडम यांनी आपल्या मनोगतातून गावातील नागरिकांची चर्चे च्या माध्यमातून प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मत्ते सर यांनी केले मान्यवरचे आभार ग्रामपंचायत अधिकारी

अविनाश चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता

गावातील सर्वांनी अधिक परिश्रम घेतले.