चंद्रपूर मनपाच्या कार्य प्रणालीवर आयोगाचे ताशेरे !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपाल मेश्राम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी दोन संस्थांचा आज आढावा घेतला.चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत रमाई आवास योजना अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा, ठक्कर बाबा आदिवासी सुधार योजना असेल किंवा लाड बाग्ये समितीच्या शिफारशीनुसार वारसांना हक्क नियुक्तीचा प्रश्न असेल अशा विविध अंगाने चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अनेक कामात व्यायामनिमीचा दिसून आली त्या संदर्भात आयोगाचे उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपर मेश्राम यांनी चांगलाच खरपून समाचार घेतला. मनपाच्या कार्यप्रणालीवर आयोगाने चांगले ताशेरे ओढले.
लाड बाय समितीच्या शिफारसी अनुसंगाने सफाई कामगाराची राज्य शासनाने तत्कालीन वेळेला परिभाषा केली असताना चंद्रपूर मनपा सफाई रेजा, सफाई कुली, अशा प्रकारचे वर्गीकरण करत या दोन्ही प्रवागात प्रवर्गातील काम करणाऱ्या सफाई कामगाराच्या पाल्यांना सफाई कामगाराच्या नाहीत असा पद्धतीने त्यांना लाडबाग समितीच्या अहवालात शिफारशी आतापर्यंत दिल्या नाहीत. दुर्दैवाने ही संख्या 341 अशी आहे. मनपात अत्यंत गंभीर बाब आहे. 2023 च्या परिपत्रकानुसार आतापर्यंत ही संख्या 47 आहे. त्यात 26 सफाई कामगारांच्या पाल्यांना लाडबाग समितीच्या शिफारशीचा लाभ देत त्यांना कामावर घेतण्यात आले असून परंतु 21 पाल्यांना मात्र विविध कारणास्तव थांबवण्यात आले आहेत. हा गंभीर प्रकार असून अनुसूचित जाती जमाती आयोग उपाध्यक्ष या नात्याने माझ्यासमोर आला आहे मनपा प्रशासनांना निर्देश केले की, येणाऱ्या पंधरा दिवसात या संदर्भाची माहिती मुंबई कार्यात येथे आपल्या स्पष्टीकरण व शपथपत्रासह हजर राहण्याचे निर्देश व आदेश देण्यात आले असल्याची माहिती आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.