चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स येथे वृक्ष लागवड आणि संवर्धन



चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स येथे वृक्ष लागवड आणि संवर्धन

दिनचर्या न्युज :-

पोंभुर्णा :-

स्थानीय चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कार्यक्रम करण्यात आला होता, येथे चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सचिव श्री स्मृप्निलजी वसंतराव दोंतुलवार यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्ष लागवड आणि संवर्धन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाविद्यालयाच्या परिसराच्या सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन परिसरांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर एम.टी. नक्षीने प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर पूर्णिमा र्मेश्राम होत्या. ते मुलांना उद्देशून म्हणाल्पा वृक्ष जेवढे लावणे महत्त्वाचे आहे त्यापेक्षा त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. कारण देशामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लावले तर जास्तीत जास्त ऑक्सिजन व्यक्तीला मिळतो. असे ते विद्यार्थ्याला उद्देशू म्हणाले

या कार्यक्रमांमध्ये उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डॉ. संगपाल नारनवरे डॉ. ओमप्रकाश सोनवणे डॉ. नितीन उपरवट प्राध्यापक विजय बुधे श्री विशाल कट कमवार श्री राहुल सूर्य तळे श्री. प्रवीण गुरनुले ज्याच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही असे विद्यार्थी सुद्धा कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते