छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या मना मनात, पोस्टर गलिच्छ जागेवर लावू नये - सुरेश पचारे शिवसेना शहरप्रमुख
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील भिंतीवर मिळेल त्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले पोष्टर लावून प्रसिद्धी मोहीम जोरदारपणे सुरू आहे. या मोहिमेत पोस्टर चिपकवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मान व प्रतिष्ठेचे भान ठेवले जात नाही . छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या मनामनात आहेत. त्यांची पोस्टर अशा गलिच्छ घाणेरड्या जागी किंवा मिळेल त्या जागेवर संपूर्ण शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर चिपकवल्या जात आहे. प्रसिद्धीच्या आसपोटी महाराजांची विटंबना होऊ नये.
चंद्रपूर शहरातील प्रत्येक वार्डात सर्वत्र देवाभाऊची प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यात शिवरायांचे पोस्टर घाणीच्या ठिकाणी लघू शंकेच्या जागेवर डुकरे राहत असलेल्या घाणीच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सोबत असलेले पोष्टर लावले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत आहे. त्यातुन जनतेच्या मनात विविध ठिकाणी विरोध दिसून येत आहे. यामुळे सदर पोस्टर चिपकवताना योग्य ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख सुरेश पचारे यांनी केली आहे.