बांबू लागवड ही शेतकऱ्यासाठी आर्थिक नियोजन व पर्यावरणपूरक
पाच हजार हेक्टर क्षेत्रावर 11 लाख बांबू लागवड
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, : -
बांबू लागवड, मिशन बांबू, हरित महाराष्ट्र,आधुनिक बांबू लागवड शेती आणि योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा परिषदच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर योजना राबवल्या जात आहे.
ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन शेतकऱ्यांना होईल. पर्यावरणासाठी याचे खूप मोठे योगदान या योजनेमार्फत होईल.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सामूहिक वनहक्क जमिनीवर व वैयक्तीक शेतकऱ्यांच्या जमिनीवर तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक जागेवर अशा सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर बांबु लागवडीचे करण्यात आले आहे. आतापर्यंत ११ लाख बांबू लागवड करण्यात आली आहे. बांबु लागवडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना काम मिळाले आहे.
माझी वसुंधरा अभियानासाठी ८२५ ग्राम पंचायतींनी सहभाग नोंदविला आहे.2024 - 25 मध्ये 5 हजार हेक्टर क्षेत्रात मनरेगा अंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यात 11 लाख बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.मागील वर्षी या अभियानात 1078 हेक्टर क्षेत्रावर बांबू वृक्ष लागवड करण्यात आली होती.हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र" अभियानाअंतर्गत ही मोहीम राबविली जात आहे.या मोहीमे मुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगार नागरिकांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सामूहिक वनहक्क जमिनीवर, तसेच ग्राम पंचायत सार्वजनिक जागेवर, स्मशानभूमी परिसरात, ऑक्सिजन पार्क व वैयक्तीक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर बांबू रोपांची लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाअंतर्गत करण्यात आली आहे.
बांबू हे पीक लागवडी मुळे वन क्षेत्रात वाढ होणार आहे. बांबु लागवडीतून गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता करणे हा या मागचा उद्देश आहे. बांबू घराचे छप्पर बवनिणे, चटई तयार करणे, टेबल, वाद्ययंत्र, कापड, अगरबत्ती, घरगुती वापरावयाच्या व शोभेच्या वस्तु तयार करण्याठी तसेच इथेनॉल बनविण्यासाठी उपयुक्त आहे. चंद्रपूरसारख्या उष्णं तापमाणाच्या जिल्ह्यातदेखील बांबुचे पीक घेता यावे यासाठी शासन स्तरावरुन नामांकित रोपवाटीकेतून उच्च प्रतीची गुणवत्तापुर्ण रोपे घेण्यात आले आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बांबुचे उत्पन्न घेणे शक्य होईल. तसेच शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. जिल्हा परिषद स्तरावरुन बांबू लागवडीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबत प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी बांबू शेती वरदान
आता शेतकऱ्यांनी जरा डोळस होणे गरजेचे आहे म्हणजे काय तर हवामान बदलाला तोंड देऊन शाश्वत उत्पन्न देणारे पीक पाहिजे भविष्यातील गरज आणि मागणी ओळखून त्याप्रमाणे पिकांची निवड करणे आणि ते पर्यावरणाला पूरक असणे आवश्यक व बंधनकारक असायला हवे. शेती वाचवायर्ची असेल तर पर्याय एक असतो. म्हणजे बांबू शेती, शेतकरी वाचवायचा असेल तर पर्याय एकच तो म्हणजे बांबू शेतीं जग वाचवायचा असेल तर पर्याय एकच तो म्हणजे बांबू शेती किंबहुना माणूस वाचवायचा असेल तर भराव्या एकच बांबू शेतीच * शेती पुढील अपुऱ्या मनुष्यबळावर बांबू शेती हाच पर्याय बेरोजगार असेल तरी चार्लेल पण शेतीतील श्रमाचे कामे करणार नाही अशी तरुणाईची वाढत चाललेली भूमिका शेतीमध्ये शेतीचे काम करणे म्हणजे आजच्या तरूणांना कमीपणा वाटतं त्या दीद्व्यम भावना वाटते असा विचार करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढत होत आहे. आता गावागावात परिस्थिती आहे की खुरपणीला सुद्धा बाया मिळत नाहीत.त्या दुसऱ्या गावातून वाहन करून आणाव्या लागतात.अत्यल्प अंतर्मशागतीची शेती म्हणजे बांबू शेती.बांबू शेतीत पिकावरील कीड व रोगराई व्यवस्थापनावर शून्य खर्च. अनियमित पावसावरही निश्चित उत्पन्न देणारे म्हणजे बांबू पिक हा उत्तम पर्याय आता शेतकऱ्यांनी आत्मसात करायला पाहिजे. भविष्यात आर्थिक परिस्थिती आणि पर्यावरणापासून संरक्षण दोन्ही माणसाला पूरक ठरतील.
माझी वसुंधरा अभियानातुन बांबू लागवड केली जात आहे.बांबूचा वापर अनेक क्षेत्रात आणि उद्योगात केला जात असल्याने,बांबूमुळे रोजगार निर्मिती सोबत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल.
पुलकित सिंह,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हापरिषद ,चंद्रपूर.
शासनाच्या जागेवर आता ग्रामपंचायत पातळीवर ही बांबू लागवड केली आहे. यामुळे मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायतला होणार आहे. ही योजना वैयक्तिक करण्यासाठी असून ती सुरुवात आहे.सार्वजनिक ठिकाणी बांबू लागवड करून ऑक्सिजन पार्क तयार करण्याचा मानस आहे.शेतकऱ्यांनी शेतात बांबू लागवड केल्यास पारंपरिक पिकापेक्षा अधिक नफा मिळवता येतो.माझी वसुंधरा अभियानातून पुढील काळात पुन्हा जास्त परिसरात बांबू लागवड केली जाणार आहे.
आशितोष सपकाळ
उपजिल्हा, कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र राज्य, रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद चंद्रपूर.