सांगोडा ग्रापं मधील भ्रष्टाचाराचे आरोप निराधार वैयक्तिक बदनामी करण्याचा हेतु पत्रपरीषदेत सांगोडा ग्रापं सरपंच संजना बोंडे यांची माहीती




सांगोडा ग्रापं मधील भ्रष्टाचाराचे आरोप निराधार

वैयक्तिक बदनामी करण्याचा हेतु

पत्रपरीषदेत सांगोडा ग्रापं सरपंच संजना बोंडे यांची माहीती

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर.

कोरपना तहसील अंतर्गत येणा_या सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीला कपाट, टेबल, खुर्ची, खेळणी देने, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सात अपंगांना पैसे वाटप, वैयक्तिक शौचालयाचा लाभ अशा कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शुभम ढवस व अन्य ग्रामस्थांनी केला. पण हे आरोप निराधार आहे. वैयक्तिक बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोप करत असल्याची माहीती सांगोडा ग्रामपंचायत ची सरपंचा संजना बोंडे यांनी पत्रपरीषदेत दीली.

संजना बोंडे म्हणाल्या कि, कोरपना तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायत सात सदस्य छोटी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये सचिन प्रभाकर बोंडे मागील पाच वर्षे सरपंच होते आणी मी जवळपास साडे चार वर्ष सरपंच म्हणून कार्यकाल पार पाडला आहे. गावात अनेक विकासकामे गेल्या साडे नऊ वर्षात झाली. गावातील काही तरुण आम्ही भ्रष्टाचार केल्याचा बिन बुडाचा आरोप वारंवार करीत तक्रारी करत आहे. याआधीही सदर तक्रारी व चौकशी झाल्या ज्यात एकही आरोप शासकीय चौकशी निष्पन्न झालेले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप महिला सरपंच असल्याने माझे वर होत असून केवळ राजकीय मतभेदातून आरोप केले जात असल्याची माहीती त्यांनी दीली. जाणीवपूर्वक ग्रामसभा मासिक सभेत गोंधळ घालून विकास कामाला अडथळा आनने व वैयक्तिक बदनामी करण्याचा विरोधकांचा हेतू आहे. कार्यकाळ चार महिन्यात संपत असून पुढे ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे या हेतूने सदर विरोधकांचा तक्रारीचा प्रपंच सुरू आहे मी व माझे पती गावात केलेले काम शासकीय नियमानुसारच केलेली आहे. विरोधक रीतसर तक्रारी न करता माझे वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न अधिकाधिक करीत आहे. याबाबत पोलीस स्टेशन कोरपना येथे शुभम ढवस व त्यांचे सोबत असणा_यांच्या विरोधात तक्रारी झालेले आहेत. तेव्हा हे प्रकरण केवळ वैयक्तिक आकसापोटी व राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची माहीती सांगोडा ग्रापं सरपंचा संजना बोंडे यांनी पत्रपरीषदेत दिली.





पत्रपरीषदेत सरपंच संजना सचिन बोंडे, पुर्व सरपंच सचिन बोंडे, सदस्य विजय लक्ष्मण लांडे, नवनाथ ढवस, बंडु भगत इ. उपस्थित होते.