... आयोग आले आणि हात ओले करून गेले?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे जाती-जमातीचे आयोग उपाध्यक्ष आले होते. त्यांनी चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा परिषद मध्ये आढावा बैठक घेतल्या. दोन संस्था मधील बैठकामध्ये शासनाच्या निधीचा व त्या निधीच्या कामाचा, आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही याचा आढावा घेतला. या संदर्भाची माहिती पत्रकारांना पत्रकार परिषदेतून देण्यात आली. त्यांनी महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर चांगलीच उधळपट्टी केल्याची माहिती त्यांनी सांगितली. शासनाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा अनागोंदी अनस्तेपोटी सर्व घोळ सुरू आरोपही त्यांनी केला. एवढेच नाही तर महानगरपालिकेची कार्यालयात अधिकाऱ्याकडून 'निधीचे कल्याण झाले की काय'अशी शंका व्यक्त केली होती!
संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी समिती नेमण्यात आले असल्याची माहिती सांगितली. उद्देश एवढाच होता की कामात नियमता यावी व ती योग्य वेळेस झाली नाही तर आयोगाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती माध्यमांसमोर आली. परंतु पत्रकार परिषद संपताच दोन्ही संस्थेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आयोगासमोर बोलवण्यात आले.
'झाकली मूठ सव्वा लाखाची 'म्हणून अधिकारी 'मेरी भी चूप तेरी भी चूप' करत आयोगाने आपले हात ओले केल्याची चर्चा सूत्राच्या माहितीनुसार समोर येत आहे. एकीकडे माध्यमातून कारवाईचे आश्वासन तर दुसरीकडे मात्र आयोगाचे हात ओले! अशी चर्चा आता होत आहे ?